आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीचे पीक गुरांच्या तोंडी: हिरवा चारा साडेतीन ते चार हजार रुपये टन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूरचे  शेतकरी पाण्याअभावी वाया जाणारे केळीचे पीक जनावरांच्या तोंडी देत आहेत. - Divya Marathi
हतनूरचे शेतकरी पाण्याअभावी वाया जाणारे केळीचे पीक जनावरांच्या तोंडी देत आहेत.
हतनूर -पावसाच्या प्रतीक्षेत हतबल शेतकऱ्यांनी जनावरे वाचवण्यासाठी पाण्याअभावी वाया जाणारे केळीचे पीक अखेर जनावरांच्या तोंडी दिले जात असल्याची बाब समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात ७५ टक्क्यांहून अधिक पेरणी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कोवळे पीक वाचवण्यासाठी, तर एकीकडे जनावरे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांवर जिवाचे रान करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी मागील वर्षी जनावरांसाठी साठवलेला चारा, भुसा व कडबा संपला आहे. ऐपत नसतानाही उसाचा हिरवा चारा ३५०० ते ४००० टनाने बाहेरून आणून जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत होरपळत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
बातम्या आणखी आहेत...