आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारसह 19 हजारांच्या दारूचा साठा पकडला; दारू अड्डा चालवणाऱ्यावर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- तालुक्यातील बाजारसावंगी परिसरात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला दारूचा साठा खुलताबाद पोलिसांनी पकडला असून दारूची वाहतूक करणाऱ्या मारुती कारसह १९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. मंगळवारी रात्री बाजारसावंगी ते जैतखेडा मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनात बाजारसावंगी पोलिस चौकीतील पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय जगताप, वाल्मीक कांबळे,  दिनेश सिरोडकर यांनी मंगळवारी रात्री बाजारसावंगी ते जैतखेडा रस्त्यावर मारुती कार (एमएच २० एजी ६३८०) मधून अवैधरीत्या विक्रीला  जात असलेली दारू रात्री ८ वाजेच्या दरम्यान पकडली. १९ हजार रुपयांच्या देशी दारूसह मारुती कार जप्त करून  मनोज तुकाराम चिकटे (रा.  रेलगाव, ता. फुलंब्री) व अप्पासाहेब पुंडलिक देवकर (रा. किनगाव, ता. फुलंब्री) या दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच  पोलिस हेडकाॅन्स्टेबल गणेश काथार, रंगनाथ भुसारे यांनी मंगळवारी संध्याकाळी सुलतानपूर बसस्थानकावर सुरू असलेला दारू अड्डा उद्ध्वस्त करून रोख रक्कम जप्त केली असून दारू अड्डा चालवणाऱ्यावर कारवाई केली आहे.   
बातम्या आणखी आहेत...