आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीट: नव्या नियमांमुळे धावपळ; घड्याळ, कानातील रिंग, शर्टचे शो बटण काढूनच दिला केंद्रांत प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवगिरी महाविद्यालयातील केंद्रातून नीट देऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनी. - Divya Marathi
देवगिरी महाविद्यालयातील केंद्रातून नीट देऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनी.
औरंगाबाद- अतिशय पारदर्शकपणे परीक्षा पार पडावी म्हणून विद्यार्थ्यांच्या हातातील ब्रेसलेट, घड्याळ, बूट, साॅक्स, तर विद्यार्थिनींच्या कानातील रिंग, नाकातील मोरणी, हेअर पिन, हँड बँड, केसांना लावण्यात येणारा बो, स्कार्प आदी साहित्य काढून नंतरच नीटसाठी त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. काही केंद्रांवर तर शर्टला असलेले फॅशनेबल बटण चक्क कात्रीने कापून काढण्यात आले. हे करत असताना व्हिडिओ शूटिंगही करण्यात आली. 
 
रविवारी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) वतीने नीट (नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट ) वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ही एमबीबीएस आणि बीडीएससाठी घेतण्यात आली. शहरातील विविध केंद्रांवर जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी रविवारी नीट दिली. पेपर तसा सोपा होता, परंतु नेहमीप्रमाणे यंदाच्या पेपरमध्येही फिजिक्सचा पेपर फिरकी घेणारा ठरला. न्यूमरिकल प्रश्नांमुळे वेळेत पेपर सोडवण्याचे आव्हान अवघड होते. पाच-सहा प्रश्न मात्र बायोलॉजीच्या पेपरमध्ये आऊटऑफ विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची नीट चांगली असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. देशभरातील १०७ शहरांत ११ लाख ३५ हजार १०४ विद्यार्थ्यांनी नोंद केली, तर औरंगाबाद विभागात ४५ केंद्रांवर २० हजार विद्यार्थ्यांनी नीट दिली. यंदा प्रथमच नांदेडलाही परीक्षा केंद्र देण्यात आले होते. नांदेड येथून १३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रांत कडक आचारसंहिता होती. यासाठी स्पेशल एक टीम नेमण्यात आली होती. दी जैन इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संतोषकुमार यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी होती.  
 
लिखने से ही अच्छे मार्क्स मिलेंगे 
कुणी हातात शोसाठी म्हणून घातलेले ब्रासलेट, तर कुणी आवड म्हणून आणि विश्वास म्हणून बांधलेले धागेदेखील काढून ठेवण्यास सांगण्यात आले होते. एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी काढण्यास तयार होत नसल्याने ‘पेपर लिखने से अच्छे मार्क्स मिलेंगे, धागा बांधने से नहीं. पेपर लिख लो, बाद में फिर से पहन लेना’ असा संवाद परीक्षार्थी आणि तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये रंगल्याचे चित्रही परीक्षा केंद्रावर दिसून आले. 
 
पेपर सोपा होता 
-मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेपर चांगला होता. जेव्हा अॅप्लिकेशन बेस्ड प्रश्न जास्त विचारण्यात अाले तेव्हा फिजिक्स अवघड गेल्याचे काहींनी सांगितले. परंतु एकंदरीत विचार करता पेपर अतिशय चांगला होता. विशाल लदनिया, शिक्षक
 
चांगले गुण मिळतील 
-वर्षभर केलेली मेहनत आणि सरावामुळे आजचा पेपर खूप चांगला गेला. चांगले गुण मिळतील असा विश्वास आहे. मात्र, चार-पाच प्रश्न आऊट ऑफ विचारण्यात आले. वैभव आघाव, विद्यार्थी 
 
आडवळणी परीक्षा केंद्राने विद्यार्थी, पालकांना त्रास 
सीबीएसई आणि स्थानिक परीक्षा समन्वयक मिळून परीक्षा केंद्र नेमण्यात येत असल्याची माहिती परीक्षेचे समन्वयक संतोषकुमार यांनी दिली. परंतु अनेक परीक्षार्थींची परीक्षा केंद्रे आडवळणी रस्त्यांवर आणि आतल्या भागात आली. चिकलठाणा, भांगसीमाता गड परिसर आदी ठिकाणांवर असलेली केंद्रे शोधण्यास पालकांनाही अवघड गेले. वसंतराव नाईक, एसबीओए स्कूल या भागात लग्न समारंभातील डीजेच्या आवाजामुळेही परीक्षार्थींना त्रास सहन करावा लागला.
 
‘ते’ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित 
दरम्यान,शहरातील काही परीक्षा केंद्रांवर दिलेल्या रिपोर्टिंग टायमिंगऐवजी उशिरा आलेल्या (कुणी दहा मिनिटे, तर कुणी पंधरा मिनिटे) विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. छत्रपती कॉलेज, पीएसबीए, खेडकर स्कूल आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने परीक्षेपासून वंचित राहावे लागले. 
 
8 जूनला निकाल 
आज झालेल्या नीट परीक्षेचा निकाल जूनला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये, प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये ठेवली आभुषणे... 
 
हे पण वाचा,
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...