आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBSE News In Marathi, School Education, Divya Marathi, Government Of India

‘CBSE ’शाळा निवडताय, तर ही काळजी घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याचे भविष्य उज्‍जवल व्हावे यासाठी पालकांचे प्रयत्न सुरू असतात. त्यातूनच सीबीएसई शाळांचे पेव फुटले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक खिशाला कात्री लावून भरमसाट फी भरतात. मात्र, त्यांची फसवणूक होऊ शकते..
देशभरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईचा अभ्यासक्रम एकसमान असतो. यामुळे कोठेही बदली झाली तरी मुलांना अडचण येत नाही. 1929 मध्ये स्थापन झालेला हा बोर्ड देशात सर्वात जुना बोर्ड आहे. भारतासह 24 देशांत या बोर्डाच्या अंतर्गत 15 हजारांहून अधिक शाळा येतात. औरंगाबादेत या बोर्डाची छावणीतील केंद्रीय विद्यालय ही एकमेव शाळा होती. नंतर नाथ व्हॅली या शाळेत हा अभ्यासक्रम आला. पुढे याला मागणी वाढली. त्यामुळे अशा शाळांची संख्या वाढत गेली; पण यातूनच पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. पालकांच्या तक्रारींनंतर डीबी स्टारने तपास केला त्या वेळी ही बाब स्पष्ट झाली.
केंद्र आणि राज्याचे बोर्ड
प्रत्येक राज्यात आपापले परीक्षा मंडळ म्हणजेच बोर्ड असते. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ आहे, तर केंद्रात सीबीएसई बोर्ड आहे. या बोर्डाची शाळा सुरू करण्यासाठी शाळांना संलग्नीकरण घ्यावे लागते. यास अँफिलिएशन असे म्हटले जाते. नंतरच हा अभ्यासक्रम शिकवता येतो. सीबीएसईचा अभ्यासक्रम राज्याच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे. त्याची पुस्तके वेगळी आहेत. मात्र, शब्दांचा घोळ करून पालकांना धडे दिले जात आहेत.
अँफिलिएशन अन् पॅटर्नवरून दिशाभूल
औरंगाबाद जिल्ह्यात केवळ 17 शाळाच सीबीएसईशी संलग्नित असल्याचे विभागाच्या वेबसाइटवरून स्पष्ट होते. त्यांना हा अभ्यासक्रम शिकवण्याची कायदेशीर परवानगी आहे. परंतु, काही शाळा शब्दच्छल करत म्हणजेच सीबीएसई ‘पॅटर्न’चे गाजर दाखवून प्रवेश प्रक्रिया राबवतात. सीबीएसईशी संलग्नीकरण झाले नसताना त्या हा अभ्यासक्रम शिकवतात. विद्यार्थी ओढण्यासाठी त्या हा मार्ग निवडतात आणि पालकही त्यास बळी पडतात. नियमानुसार सीबीएसई अँफिलिएशन असणार्‍या शाळांतच या अभ्यासक्रमानुसार दहावीची केंद्रीय बोर्ड परीक्षा देता येते, तर सीबीएसई पॅटर्न असणार्‍या शाळा शिक्षण सीबीएसई अभ्यासक्रमानुसार देतात; पण येथे दहावीची परीक्षा राज्य बोर्डातून द्यावी लागते.
दहावीला होतो त्रास
हा पॅटर्न राबवणार्‍या शाळांत नववीपर्यंत अडचण येत नाही; पण हे विद्यार्थी जेव्हा दहावीत जातात त्या वेळी मात्र संलग्नीकरण नसल्यामुळे त्यांना सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसताच येत नाही. यामुळे शाळा चालाखी करत या विद्यार्थ्यांना राज्याच्या बोर्ड परीक्षेत बसवतात. म्हणजेच अभ्यास सीबीएसईचा करायचा आणि परीक्षा मात्र राज्य बोर्डाची द्यायची, असा हा प्रकार आहे.
दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
सीबीएसईशी संलग्नीकरण नसल्यामुळे त्यांचे स्टँडर्डही शाळा पाळत नाहीत. येथील शिक्षक, सुविधा, पुस्तके, प्रयोगशाळा, गं्रथालय याबाबत सीबीएसईचे नियम कडक आहेत; पण केवळ पॅटर्न राबवणार्‍या शाळा ते पाळत नाहीत. यामुळे सीबीएसई बोर्डात शिकवण्याचा मूळ हेतूच साध्य होत नाही.
ऐनवेळी मुले उघड्यावर
गेल्यावर्षी एका शाळेत असाच प्रकार झाला. शाळेने सीबीएसईच्या नावावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. यापैकी तब्बल 19 विद्यार्थी दहावीच्या वर्गात पोहोचले. मग शाळेने त्यांना ऐनवेळी राज्य बोर्डाची परीक्षा देण्यास सांगितले. पालकांनी याबाबत विचारणा केली असता सीबीएसईशी संलग्नीकरण आले नसल्याचे कळले. यावरून पालक आणि शाळा प्रशासनात मोठा संघर्ष झाला. शेवटी पालकांनी या मुलांना येथून काढून दुसर्‍या सीबीएसईच्या शाळेत टाकले. एका शाळेत एवढे विद्यार्थी घेणे शक्य नसल्यामुळे वेगवेगळ्या शाळांत मुलांना प्रवेश द्यावा लागला होता.
पुढे वाचा चेन्नई ते दिल्ली प्रवास....