आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावडता विषय बदलण्याची सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अकरावीमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थांसाठी या शैक्षणिक वर्षापासून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईच्या वतीने व्होकेशनल कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यार्थांना विषयाची निवड करण्याची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे अकरावीमध्ये निवडलेला विषय विद्यार्थी बारावीसाठी प्रवेश घेताना बदलू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचा विषय अभ्यासता येईल. तसेच करिअरसाठीही यामुळे मदत मिळेल.

स्पध्रेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसेच बारावी बोर्डसारख्या वर्षात त्यांच्यावर अभ्यासाचा ताण येऊ नये यासाठी विद्यार्थांना आवडत नसलेला किंवा अवघड विषय बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. अकरावीतच विषय अवघड वाटत असेल तर बारावीत प्रवेश घेताना विद्यार्थाला व्होकेशनल कोर्समधील एक विषय निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

असा होईल बदल
नवीन बदलामुळे सायन्सच्या विद्यार्थाला केमिस्ट्री हा विषय अवघड वाटत असेल तर त्यासाठी व्होकेशन कोर्सपैकी एक विषय निवडता येणार आहे. यासाठी वेगळी फी घेतली जाणार नाही. कॉर्मस शाखेतील विद्यार्थांनादेखील विषय बदलण्याची मुभा असणार आहे.

शाळेत दोन कोर्स
नव्याने सुरू करण्यात आलेल्या 43 व्होकेशनल कोर्सपैकी शाळेतील सुविधेनुसार शाळेला कोणतेही दोन कोर्स सुरू करता येणार आहेत. त्यासाठी एका आठवड्यात नऊ तासिका घ्याव्या लागतील. या नवीन बदलांसाठी शिक्षकांनादेखील प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक तासिका 40 मिनिटांची असणार आहे.

माहिती मिळेल
ही नावीन्यता विद्यार्थ्यांना नक्कीच आवडेल. एकाच प्रकारच्या विषयांऐवजी वेगळे विषयदेखील शिकायला मिळतील. महेश वाळवणकर, शिक्षक, केंद्रीय विद्यालय

करिअरला दिशा
यामुळे विद्यार्थ्यांना त्याच पारंपरिक कोर्सऐवजी नवीन करिअर निवडण्याची संधी मिळेल. व्यक्तिमत्त्व विकासासाठी याचा निश्चितच फायदा होईल. सविता जोब, माजी प्राचार्य, केंद्रीय विद्यालय