औरंगाबाद - लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या घाटीतील मेडिकल बोर्डाचा कारभार सगळ्यांना कळावा, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना अभ्यागत समितीने केली. ती आठवडाभरात अमलात आणण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. सर्व सदस्यांच्या नियुक्तीनंतर पहिल्यांदाच अभ्यागत समितीची बैठक अध्यक्ष माजी आमदार एम. एम. शेख यांनी घेतली. यामध्ये बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छता आणि रिक्त जागांची भरती अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
शासकीय नोकरीतील कर्मचा-यांनी रजा घेतल्यावर ते तंदुरुस्त आहेत का, याची तपासणी बोर्डात केली जाते. याशिवाय कुठल्याही शासकीय नोकरीत निवड झाल्यानंतरही मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र उमेदवारांना दाखल करावे लागते. महिन्याच्या दुस-या-चौथ्या किंवा पहिल्या-तिस-या बुधवारी दुपारी 3 ते 5 या वेळात होणारी मेडिकल बोर्डाची कारवाई सीसीटीव्हीमध्ये े२कैद होणे पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जवळपास एक हजार कर्मचारी बोर्डासमोर महिनाभरात सादर होत असतात.
या सर्वांना या पारदर्शकतेचा मोठा फायदा होणार आहे. याविषयी अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, याला मंजुरी दिली. तर अधीक्षक डॉ. पी.एल. गट्टाणी यांनी आठवडाभरात अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीला चंद्रभान पारखे, वीणा खरे, पुष्पा सलामपुरे, डॉ. मंगला बोरकर, डॉ. सुहास जेवळीकर, यशवंत कांबळे, मकरंद कुलकर्णी, उदयराज पवार, उरुज सिद्दिकी यांची उपस्थिती होती.
बांधकाम गुणवत्ता सुधारा
प्रारंभी बांधकामाच्या दर्जाविषयी चर्चा झाली. दोन वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या मेडिसिन इमारतीत काही ठिकाणी फरशा निखळल्या आहेत. प्लास्टर उखडले आहे. पाण्याची गळती होणे या समस्या आहेत. इतक्या कमी काळात हा सगळा प्रकार होत असून, याला बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने कामाची गुणवत्ता सुधारावी याकडे सर्वांनी लक्ष वेधले. नवीन ग्रंथालय इमारत, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वसतिगृह आणि मानसोपचार वॉर्डाच्या इमारतीचे काम लवकर करण्याची मागणी करण्यात आली.
साडेतीन वर्षांनंतर समिती गठित
राज्य सरकार सत्तेत आल्यानंतर अभ्यागत समिती गठित होते. रु ग्णसेवेच्या दृष्टीने विविध सूचना करण्याचे काम ही समिती करते. मात्र, यंदाची समिती गठित होण्यासाठी साडेतीन वर्षे लोटली. यानंतर मंत्र्यांच्या वादात सदस्यांची नावे अडकली. विविध प्रयत्नांनी आमदार सतीश चव्हाण यांनी सदस्यांची नावे अंतिम करून आणली. सर्व सदस्यांच्या नियुक्तीनंतर ही पहिलीच बैठक होती. त्याला चव्हाणांची अनुपस्थिती होती.
सूचनांनी वेधले लक्ष
सफाई कामगार आणि वर्ग 4 ची 744 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 551 पदे भरलेली आहेत.
193 रिक्त पदे तसेच प्राध्यापकांच्या
जागा भरण्यात याव्यात
औषधांसाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडे निधीसाठी पाठपुरावा करावा
64 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यात वाढ करून 24 कॅमेरे लावण्यात यावेत.