Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | cctv camera in harsul jail criminal watch aurangabad

‘हर्सूल’मध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी; तुरुंगातील गैरकृ त्य कॅमे-यात कैद होणार

प्रतिनिधी | Update - Jun 15, 2012, 08:04 AM IST

हर्सूल कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबण्यात येत असल्यामुळे आतील वातावरण बिघडत आहे.

 • cctv camera in harsul jail criminal watch aurangabad

  औरंगाबाद - हर्सूल कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबण्यात येत असल्यामुळे आतील वातावरण बिघडत आहे. सचिन तायडे हल्ला प्रकरणानंतर कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी तुरुंगात सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
  पूर्वी हर्सूल तुरुंगाची क्षमता केवळ 540 कैदी राहू शकतील एवढीच होती. काही वर्षांपूर्वी प्रशासनाने 600 कैद्यांची व्यवस्था केली. आजमितीला 1100 कैदी खचून भरण्यात आले आहेत. सचिन तायडेवर झालेल्या हल्ल्यानंतर तुरुंगातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पैठण खुले कारागृह अधीक्षक पी. डी. भालेराव यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
  * माझ्या अधिकारात एकूण 14 कारागृहे असून दोन मध्यवर्ती (हर्सूल, नाशिक) आणि दोन खुल्या कारागृहांचा समावेश आहे. हर्सूल कारागृहात सध्या 1100 कैदी आहेत. या कारागृहात 2000 कैदी ठेवू शकतो. नियमाप्रमाणे 600 कैदी ठेवता येतात. सचिन तायडे प्रकरणाचा चौकशी अहवाल येताच कारवाई होईल. - सुरेश चव्हाण, उपमहानिरीक्षक, हर्सूल कारागृह
  कैद्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी हर्सूल कारागृहासह आता महाराष्ट्रातील पाच प्रमुख मध्यवर्ती कारागृहांत सीसी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाचे उपमहानिरीक्षक सुरेश चव्हाण यांनी दिली.
  महाराष्ट्रातील येरवडा, नाशिक, मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात सीसी कॅमेरे लावण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. कॅमेरे लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी विविध कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात आले होते. त्याचे ई टेंडरिंग होणार असून कारागृहासाठी अडीचशे सीसीटीव्ही कॅमे-यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 12 हेक्टरमध्ये तुरुंगाचा परिसर आहे. सध्या या कारागृहात 1100 कैदी आहेत. त्यापैकी 35 महिला कैदी असून महिलांसाठीदेखील आता स्वतंत्र बराक बांधण्याचे काम सरू आहे. या तुरुंगामध्ये दिवसेंदिवस कैद्यांची संख्या
  वाढत असून त्यासाठी नवीन बराक बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे कारागृहाच्या सुरक्षेसाठी अधिका-यांसह 266 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी 48 पदे रिक्त आहेत.
  अधिका-यांची रिक्त पदे : कारागृह अधीक्षक -1, वैद्यकीय अधिकारी-2, वरिष्ठ तुरुंग अधिकारी-2, तुरुंग अधिकारी-4, एकूण- 7.

Trending