आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीच्या कैदेत ८००० दुचाकीस्वार, पाेलिसांनी सेफ सिटीअंतर्गत बसवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा पोलिसांना तपास कार्यात चांगला फायदा होत आहे. या सीसीटीव्हींनी रस्त्यावरील हालचाली टिपल्या आहेत. शहरात तीस ठिकाणी बसवण्यात आलेल्या ४९ सीसीटीव्हींच्या चित्रिकरणात वाहतुकीचे नियम मोडताना कैद झालेल्या हजार ७०० वाहनचालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
त्यापैकी ६० टक्के वाहनधारकांनी दंडही भरला आहे. यासोबतच तीन खून, १२ जबरी चोऱ्या रिक्षा दुचाकी चोरीची प्रकरण तडीस लावण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदिप आटाळे यांनी दिली. ‘सेफ सिटी’ उपक्रमांतर्गत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ४९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेतला. यात काही उच्च क्षमतेचे कॅमेरे असल्याने घटनेतील व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतो. त्यामुळे आरोपीस पकडणे सोपे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिग्नल तोडणे, रस्त्याच्या उलट्या दिशेने गाडी चालवणे, नियम तोडणारे रिक्षाचालक आदी कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना कॅमेऱ्यात टिपले गेलेले छायाचित्र दंडाची पावती घरपोच पाठवण्यात आली. पोलिस आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही कॅमेरात कैद होणाऱ्या घटनांचा आढावा घेतला जातो.

हरवलेली मुलेही सापडली
उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांमुळे शहरात घडलेल्या मोठ्या गु्न्ह्यांतील आरोपी पकडण्यात पोलिसांना मोठी मदत झाल्याचे आटाळे यांनी सांगितले. क्रांती चौक परिसरात ३१ डिसेंबर रोजी पार्टीसाठी गेलेल्या दोन तरुण दोन तरुणींपैकी एका तरुणाचा खून झाला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमे ऱ्यांच्या चित्रीकरणातून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. तसेच छावणी परिसरात एका व्यक्तीचा खून करून मृतदेह जळगाव जिल्ह्यात नेऊन टाकला होता. हा गुन्हाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच उघडकीस आला. तसेच सिडको एमआयडीसी पोलिसांनाही एक खुनाचा गुन्हा याच पद्धतीने उघडकीस आणला आहे. याशिवाय तीन हरवलेल्या मुलांचाही सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...