आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसर्‍या डोळ्याच्या निगराणीत 51 सोसायट्यांतील वाहने सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने गाड्यांची जाळपोळ करणारे माथेफिरू आणि चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. दुसरीकडे 51 सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असल्याने तेथे वाहन जाळण्याच्या घटना घडल्या नसल्याचे समोर आले आहे.
घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी आणि कार जाळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील तीन महिन्यांमध्ये माथेफिरूंनी शहरातील विविध भागांत 14 वाहने जाळली आहेत. मंगळवारी मध्यरात्री हडकोतील रंजनवन सोसायटीत दुचाकी जाळून दोन कारला पेटवण्याचा प्रयत्न झाला. पै न् पै जोडून खरेदी केलेले वाहन जाळण्यात येत असल्याने नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सिडको एन-8 मधील न्यायालयीन सोसायटीसारख्या काही वसाहतीतील नागरिकांनी पहारा देण्याचा प्रयोग सुरू केला होता. परंतु नंतर मात्र हा प्रकार बंद झाला. कंटाळून 51 सोसाट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर येथील वाहने जाळणे आणि घरफोड्यांना आळा बसला आहे.
सुरक्षेसाठी काळजी घेतली
मानसी देशपांडे हत्याकांडानंतर आम्ही काळजी घेतली आहे. अहिंसानगरमध्ये येणार्‍या तिन्ही प्रमुख मुख्य द्वारांना चॅनल गेट बसवले आहेत. तेथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे स्वस्त
सीसीटीव्ही कॅमेरे 15 ते 70 हजारांपर्यंत आहेत. या रकमेत एकूण चार कॅमेरे मिळू शकतात. साधा कॅमेरा साधारण 5 ते 10 मीटर आणि उच्च दर्जाचा कॅमेरा 20 मीटरपर्यंतच्या परिसरातील स्पष्ट चित्रीकरण करतो. मनोज संतासे, कॅमेरे विक्रेते
गस्तीमुळे वाहने जाळणे थांबले
चोर्‍या आणि वाहने जाळण्याचा प्रकार थांबवण्यासाठी आम्ही अध्यक्ष विलास राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त सुरू केली. चोर्‍यांना आळा बसला. गस्त बंद झाल्याने चोरीच्या घटना घडत आहेत.