आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्सच्या पार्किंगमध्ये कॅमेरे लावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पंचतारांकित व थ्री स्टार हॉटेल, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि सिनेमा थिएटर्ससह पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा सूचना पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शुक्रवारी दिल्या. पुणे बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर शुक्रवारी दुपारी 12 वाजता पोलिस आयुक्तालयात आयोजित बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीला पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव यांचीही उपस्थिती होती.

शहरातील काही मॉल्स, पंचतारांकित व थ्री स्टार हॉटेल, मल्टिप्लेक्स, सिनेमा थिएटरच्या पार्किंगमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे नाहीत. बर्‍याच ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची तपासणीही केली जात नाही. मॉल, हॉटेल्स, वर्दळीची ठिकाणे आणि मोठय़ा इमारतींच्या बाजूला पार्किंग नसावी. पार्किंगमध्ये जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी. दोन-तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या वाहनाची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्याला कळवावी. 12 तासांच्या आत वाहन न घेऊन जाणार्‍या वाहनांची माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरून ते वाहन लवकरात लवकर तपासता येईल. त्याचप्रमाणे कचराकुंड्या एखाद्या कोपर्‍यात न ठेवता त्या दर्शनी भागात ठेवायला हव्यात. दर अध्र्या तासाला या कचराकुंड्या उघडून बघाव्यात. सीसी टीव्ही कॅमेर्‍यांची ऑपरेटिंग 24 तासांत होईल अशी व्यवस्था करावी. हॉटेल ताज, अँम्बेसेडर, रामा इंटरनॅशनल, लेमन ट्री या हॉटेलचे व्यवस्थापक तसेच प्रोझोन, बिग बाजार आणि रिलायन्स मॉल आणि सत्यम, पीव्हीआर आदी थिएटरच्या मालक व अध्यक्षांची या वेळी उपस्थिती होती.

पोलिस आयुक्तांच्या सूचना
अज्ञात वाहनाची माहिती नजीकच्या पोलिसांना कळवा
पार्किंगचे ठिकाण इमारतीपासून दूर असावे
पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
कचराकुंड्या दर अध्र्या तासाला तपासाव्यात