आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या सीसीटीव्हीचा मुद्दा विधानसभेत, सीएम म्हणतात, सर्व कॅमेरे सुरू, प्रत्यक्षात 7 बंदच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, अाैरंगाबाद- ‘सेफ सिटी’ प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद शहरात लावण्यात आलेले सर्व म्हणजे ४८ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. प्रत्यक्षात सध्या ४८ पैकी ७ कॅमेरे बंदच असल्याचे स्थानिक पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

औरंगाबाद शहरात सेफ सिटी प्रकल्पांतर्गत दोन वर्षांपूर्वी दोन कोटी रुपये खर्च करून ४८ सीसीटीव्ही बसवण्यात आले होेते. त्यातील २८ कॅमेरे जून २०१७ मध्ये बंद पडल्याचे उघडकीस आले. काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सीसीटीव्ही नादुरुस्त झाल्याची कबुली दिली. मात्र, हनीवेल इंटरनॅशनल कंपनीशी औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी पत्रव्यवहार केला. मग, कंपनीने नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त केले असून सद्य: स्थितीत सर्व सुरू आहेत. कंपनीने दुरुस्तीसाठी अभियंत्याची नेमणूकही केल्याचे उत्तरात म्हटले आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, २८ कॅमेऱ्यांची दुरुस्ती झाली होती. परंतु, सद्य:स्थितीतही सात कॅमेरे बंदच आहेत.

आमदारांनी मांडला मुद्दा
औरंगाबादेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त कधी करणार, संबंधित जबाबदार कंपनीवर कारवाई करणार का, असा तारांकित प्रश्न आ. अब्दुल सत्तार,  यशोमती ठाकूर, निर्मला गावित आदी सदस्यांनी केला होता.
बातम्या आणखी आहेत...