आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवातच पोलिसांचा तिसरा डोळा बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सव नागरिकांसाठी आनंदाचा सोहळा असला तरी चोर, दरोडेखोर अन् अतिरेक्यांसाठी ही संधी समजली जाते. त्यामुळे पोलिसांवर दहा दिवस प्रचंड ताण असतो. या तणावाच्या काळात त्यांना मदत होते ती तिसरा डोळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची. मात्र, ऐन गणेशोत्सवातच हा तिसरा डोळा बंद होता, तरीही पोलिसी खाक्या अन् बाप्पांच्या कृपेने कुठेही गालबोट लागता विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला.

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाडा अतिरेकी कारवायांमुळे संवेदनशील भाग म्हणून ओळखला जाऊ लागला. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड परभणी या जिल्ह्यांत यापूर्वी ऐन सणासुदीच्या काळातच अतिरेक्यांनी घातपात केला होता. वेरूळ येथे आरडीएक्ससह शस्त्रांचा साठा तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने पकडला होता. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाची लिंक बीडपर्यंत होती.

यानंतर हिमायतबागेत एटीएसच्या पथकाने एका अतिरेक्याचे एन्काउंटर केले होते. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कंट्रोल रूम वरिष्ठांना केबिनमध्ये ठेवले. काही दिवस या कॅमेऱ्यांची करडी नजर गुन्हेगारांवर होती, परंतु गणेशोत्सवात औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक संवेदनशील भागातील कॅमेऱ्यांचा कंट्रोल रूमशी असलेला संपर्क तुटला.

कडक पहारा दिला
संवेदनशील औरंगाबादसह काही जिल्ह्यांत अशी अवस्था होती. आमच्या जवानांनी शीण येऊ देता कडक पहारा दिल्याने उत्सव निर्विघ्न पार पडला. विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

हॅथवेने दिला हात
पोलिसांनी गवगवा करता पोलिस यंत्रणा चोवीस तास सतर्क ठेवत गणेशोत्सव पार पाडला. औरंगाबाद आयुक्तालय हद्द वगळता ग्रामीण भागात हॅथवे इंटरनेटचे कनेक्शन होते. पोलिसांच्या मते अव्वाच्या सव्वा बिल आकारल्याने बिल भरले गेले नाही. याच गडबडीत सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. शेवटी पोलिस प्रशासनाने बीएसएनएलचे ब्रॉडबँड घेतले. मात्र, ते कनेक्शन कुचकामी ठरल्याने पोलिसांचा नाइलाज झाला. जवानांवर विश्वास दाखवत अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात बंदोबस्तांचे शिस्तबद्ध नियोजन केले. त्यामुळे तिसरा डोळा बंद असूनही त्याची उणीव पोलिसांनी भासू दिली नाही.