आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांदी चोरणार्‍या महिला सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चांदीची चेन खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानात घुसून अर्धा किलो चांदी लांबवणार्‍या दोन महिलांचे सीसीटीव्हीचे फुटेज गुन्हेशाखेच्या हाती लागले आहेत. गजानन महाराज मंदिर परिसरातील बावस्कर ज्वेलर्समध्ये 12 फेब्रुवारीला दुकानात गणेश बाविस्कर यांच्या पत्नी होत्या. दोन महिलांनी चेन खरेदीच्या निमित्ताने दुकात प्रवेश केला आणि अर्धा किलो चांदीचे दागिने लांबवले. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोर महिलांचे फुटेज आले असून ते पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

काय करतात या महिला चोर : ज्वेलर्समध्ये चांदी किंवा सोने खरेदी करण्याचे निमित्त करून त्या प्रवेश करतात. दुकान मालकाला विविध डिझाइन किंवा वजनाच्या वस्तू दाखवायला लावतात. एक दागिने पाहण्याचे नाटक करते, तर दुसरी दुकान मालकाला बोलण्यात गुंतवते. अशा प्रकारे दागिने लंपास करून त्या पसार होतात.

(छायाचित्र :दोन महिलांनी खरेदीचा बहाणा केला.)