आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल लागण्यापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सहा वाजेपर्यंत वानखेडेनगर आणि एकतानगर वॉर्डाचे मतदान संपले होते. त्यानंतर एकतानगर वॉर्डाचे अपक्ष उमेदवार रूपचंद वाघमारे यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ २५ हजार रुपयांचे फटाके फोडून आतषबाजी केली.
बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेच्या वेळी अनेक उमेदवारांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अनेकांनी आपले मोबाइलही बंद करून ठेवले, तर दुसरीकडे वॉर्ड क्रमांक तीनमधील उमेदवार वाघमारे यांनी स्वयंस्फूर्तपणे आपला निकाल घोषित करून प्रचंड आतषबाजी केली. त्यामुळे विरोधकांसह आसपासच्या वानखेडेनगर, हर्सूल, चेतनानगर वॉर्डातील उमेदवारांसह मतदारांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
२०१० च्या निवडणुकीतही वाघमारे यांनी अशा प्रकारे निकालाच्या एक दिवस आधीच आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला होता. या वेळीही त्यांनी फटाके फोडल्याने या वॉर्डातील नऊ उमेदवारांचे हातपाय गळाल्यासारखे झाले. तरीही निकालात चमत्कार घडण्याची अपेक्षा इतर उमेदवारांना आहे.