आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये पाच वर्षांपासून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण रखडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 39 राजाबाजारअंतर्गत येणा-या अंगुरीबागेतील हाजी कासीम मशिदीसमोरील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण रखडले आहे. पावसाचे पाणी आणि ड्रेनेज पाणी मशिदीसमोर साचले आहे. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि महापौर कला ओझा यांनी रस्त्याची पाहणी करून सहा महिने उलटले तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

दिवाण देवडी ते अंगुरीबाग या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याची चाळणी झाली असून पावसाळ्यात पाण्याचे डबके साचते आहे. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या ठिकाणच्या खड्ड्यामुळे वाहने घसरतात. या रस्त्यावरून थेट औरंगपुरा, विद्यापीठ, मोंढा या भागाकडे जाणा-या वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. सिमेट काँक्रिटीकरण झाल्यास नागरिकांचा प्रश्न सुटेल. यासाठी मनपाने, नगरसेवकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सय्यद शहाबुद्दीन, श्रावण जांगडे, अब्दुल, नसीर, सय्यद अमीनुउद्दीन, अब्दुल खादर मिस्त्री आदींनी केली आहे.

- ऐन पावसाळ्यात मशिदीसमोर पाण्याचे तळे साचले आहे. नगरसेवकही याकडे लक्ष देत नाही.
सय्यद शहाबुद्दीन, रहिवासी
- रस्त्यासंदर्भात नगरसेवकांकडे वारंवार सांगितले. रस्ता मंजूर असल्याचे सांगतात, पण काम करत नाही. अशोक इंगळे, रहिवासी
फोटो - अंगुरीबागेतील हाजी कासीम मशिदीसमोरील रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे.