आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक ८२, बाळकृष्णनगर परिसरातील विजय चौक येथून पहाडे कॉर्नर आणि पतियाळा बँकेपर्यंतच्या रस्त्याचे काम काही महिन्यांपासून रखडलेले होते. पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’त वृत्त प्रकाशित होताच मनपाने दखल घेत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे.

पहाडे कॉर्नर आणि पतियाळा बँकेपर्यंतचा रस्त्याची चाळणी झाल्यामुळे वाहनधारकांची फजिती होत होती. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचे काम कधी होईल, याची प्रतीक्षा होती. महापौर कला ओझा व तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतरही तीन-चार महिने रस्त्याचे काम होत नव्हते. याबाबत ‘दिव्य मराठी’ने या रस्त्याचे काम रखडल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांची समस्या मार्गी लागली.