आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Center Will Open To Promote The Reproduction Of Kadaknath Cock In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कडकनाथ कोंबडी दिसायला पूर्ण काळी.. मांस व रक्तही काळेच; 50 रूपयांला एक अंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'कडकनाथ' या काळ्या कोंबडीमुळे राज्याचे अर्थकारण बदलू पाहात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडकनाथ कोंबडीच्या पालण पोषणसोबतच तिच्या प्रजननवृद्धीसाठी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले की, सरकारकडून कडकनाथ कोंबडीचे उत्पादन वाढवण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे एक केंद्र सुरु करण्‍यात येणार आहे. यासाठी सरकारने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

तुळजापूरपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थगाव येथे पायलट प्रोजेक्टच्या रुपात पशुपालन विभागाच्या जमिनीवर हे केंद्र सुरु करण्‍यात येणार असल्याचे जानकरांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्याचे पशु अधिकारी डॉ. नामदेव आघव यांनी सांगितले की, शिंदेवाडी येथे कडकनाथ कोंबडीच्या उत्पादन वाढीसाठी जिल्हापरिषदेच्या सेस फंडमधून एक लाख रुपये देण्यात आले आहेत. गावातील महिला बचत गटांना कडकनाथ कोंबडी व कोंबड्यांचे वितरण कररण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...कोंबडी दिसायला पूर्ण काळी, मांस व रक्तही काळेच..
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser