औरंगाबाद- मध्य विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनोद पाटील यांच्या बुढीलेन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उमेदवार विनोद पाटील यांच्यासह औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जुबेर मोतीवाला, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कमाल फारुकी, नगरसेवक अभिजित देशमुख, नगरसेवक नासेर कुरेशी, अतिक मोतीवाला, तारेख लतीफ, पप्पू कलानी, वाजिद जहागीरदार, शेख अझर, असिफ पटेल, अल्ताफभाई, अश्पाकभाई, शेख अखिलभाई, शफिकभाई, असिफभाई आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी बुढीलेन प्रचार कार्यालयापासून ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या पदयात्रेचे चेलीपुरा, सिटी चौक, पोस्ट आॅफिस येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. विनोद पाटील यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. एकतानगर, जटवाडा परिसरामध्येही घरोघरी जाऊन पाटील यांनी निवडून देण्याचे आवाहन केले. बुढीलेन प्रचार कार्यालय येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.