आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा बचतीतून सर्वांना मिळणार अखंडित वीज,केंद्र सरकारची योजना ठरणार संजीवनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रसरकारतर्फे वीज बचतीसाठी एलईडी बल्ब वाटप योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. यातून दररोज ५० मेगावॅट विजेची बचत होणार आहे. औरंगाबादचा सोलार सिटीत समावेश झालेला असल्याने त्याअंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर सोलार संच बसवले जाणार आहेत. याशिवाय ३०८ कोटी रुपयांची ऊर्जा विकासकामे केली जाणार असून या योजना ऊर्जा विकासासाठी संजीवनी देणाऱ्या ठरणार आहेत. ऊर्जा बचतीतून अखंडित वीज उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानामुळे जलसाठ्यात जेमतेम पाणी उरले आहे. कोळशाच्या खाणी विरळ झाल्या आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारी साधनसामग्रीच खालावल्याने वीज निर्मितीचे काम अवघड होऊन बसले आहे. दुसरीकडे, विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
राज्यात ऑक्टोबरमध्ये विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटवर पोहोचली होती, शहरात ५० मेगावॅटने मागणी वाढली होती. त्यामुळे वीज गळती चोरीचे प्रमाण जास्त असलेल्या परिमंडळात भारनियमन केले जाते. यात मराठवाड‌याचा पहिला क्रमांक लागतो. त्याचा वीज बिल नियमित भरणाऱ्या लाखो वीज ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. यात सुधारणा करून सर्वांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र, राज्य सरकार महावितरणच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च २०१९ पर्यंत एलईडी बल्ब वाटप योजना राबवण्यात येत आहे. ७७ कोटी बल्ब वाटपातून वर्षाला १०० बिलियन युनिटिस औरंगाबाद परिमंडळात ६४ लाख बल्ब लावून दररोज ५० मेगावॅट विजेची बचत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ४० टक्के विजेची बचत करणारे कृषिपंप वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय सवलतीच्या दरात सोलार संच देण्यात येणार आहेत. औरंगाबाद सोलार सिटीमध्ये समावेश झालेला असल्याने त्याअंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर सोलार संच बसवले जाणार आहेत. यामुळे मागणी आणि उपलब्ध विजेचा मेळ घालून सर्वांना वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एअरबंच केबल चोरी अपघात रोखणार
महावितरणनेनोव्हेंबर २०१४ मध्ये शहर वीज वितरणाचा कारभार पुन्हा हाती घेतला. त्याला वर्ष होऊनही वीज गळती, वीजचोरी रोखणे अखंडित सेवा देण्यास महावितरणला फारसे यश आलेले नाही. वीज गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांवर गेले आहे. वीजचोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय वीज चोरीसाठी आकडे टाकले जात असल्याने वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होतो. त्यातून वीजभार वाढून मीटर, बल्ब, ट्यूब, उपकरणे जळून मोठे नुकसान होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महावितरणने जी योजना आखली, त्याअंतर्गत १० किमी. एअर बंच केबल टाकण्यात आली. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून २०० किमी केबल टाकण्याचे प्रस्तावित आहे. ५० किमी भूमिगत केबल टाकली जाणार आहे. यातून वीजचोरी अपघात रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे यांनी सांगितले.

३०८ कोटी रुपयांची ऊर्जा विकासकामे केली जाणार
५० मेगावॅटविजेची दररोज शहरात बचत होणार आहे.
आठ दिवसांत वीजचोरी करणाऱ्या १७० ग्राहकांना पकडून २२ लाखांचा दंड सुनावला आहे. वीजचोरी कमी करण्यासाठी वर्षभर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी फीडरनिहाय व्यवस्थापकांची नियुक्ती केली जाणार आहे. वीज गळती रोखण्यासाठी ७०० मीटर बदलून दिली आहेत. हजार नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. वीज बचतीसाठी सोमवारपासून गावागावात, शाळा, महाविद्यालयांत जनजागृती अभियान सुरू केले जाणार आहे. या उपक्रमातून आवश्यक तेव्हाच वीज वापरा, विद्युत उपकरणाची वीज पूर्ण बंद करा, एक मेगावॅट वीज निर्मितीसाठी पाच कोटींवर खर्च लागतो अशी माहिती विद्यार्थ्यांना, वीज ग्राहकांना देऊन वीज बचतीसाठी, राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यकारी अभियंता शेवाळे यांनी सांगितले.

ऊर्जा बचत योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
केंद्र,राज्य सरकार महावितरणच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी एलईडी, सोलार संच योजना आणली आहे. यातून मोठ्या प्रमाणात विजेची बचत होईल. त्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. वीजचोरी गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बंगळुरूच्या धर्तीवर औरंगाबादेतील वीज ग्राहकांना सोलार आणि विजेवर चालणारे मीटर मिळावेत. - शरद चौबे, सदस्य, ऊर्जा मंच.
बातम्या आणखी आहेत...