आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government Udyog Aadhar Special Expedition In December

केंद्राची ‘उद्याेग अाधार ज्ञापन’ विशेष माेहीम डिसेंबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु मध्यम उद्यम मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक सूक्ष्म, लघु मध्यम उपक्रमांना उद्याेग अाधार ज्ञापन दाखल करणे अावश्यक अाहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील जे उद्याेग उत्पादन करत अाहेत. तसेच जे सेवा उद्याेग कार्यरत झालेले अाहेत, अशा उद्याेग उपक्रमांना संगणकीकरणाच्या माध्यमातून उद्याेग अाधार ज्ञापन देण्याची विशेष माेहीम राबविण्यात येणार अाहे. जिल्हा उद्याेग केंद्राकडून ते ३१ डिसेंबरदरम्यान शासकीय सुटीचे दिवस वगळून ही माेहीम राबविली जाणार अाहे.

इच्छुक उद्याेजकांनी या माेहिमेचा लाभ घेण्यासाठी साेबत अाधारकार्ड, बँक खाते क्रमांक, अायएफएस काेड, मेल अायडी यांसह कार्यालयीन वेळेत जिल्हा उद्याेग केंद्र, शासकीय अायटीअायजवळ, सातपूर, नाशिक येथे उपस्थित राहून उद्याेग अाधार ज्ञापन अाॅनलाइन पद्धतीने नाेंदवून घ्यावे, ज्या उद्याेग घटकांनी यापूर्वी उद्याेग सेवा उद्याेगांकरिता एम-१, एम-२ लघु उद्याेग नाेंदणी घेतलेली अाहे. त्यांना उद्याेग अाधार ज्ञापन घेणे बंधनकारक नाही. तथापि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उद्याेग अाधार ज्ञापन अाॅनलाइन करून घेणे सयुक्तिक असल्याने या माेहिमेचा लाभ उद्याेजकांनी घ्यावा, असे अावाहन जिल्हा उद्याेग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले अाहे.