आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Squad Not Temporary, But Permanent Assistance Signal

केंद्रीय पथकाचे तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी मदतीचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळी मराठवाड्याचा धावता दौरा करून पथक बुधवारी सायंकाळी विमानाने रवाना झाले. येथील परिस्थिती पाहून पथकातील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली. केवळ एका खरीप किंवा रब्बीसाठी तात्पुरती मदत करता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजेच कायमची मदत करण्याचे संकेत या पथकातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत, असे स्थानिक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्पुरती मदत किती असेल अन् कायमस्वरूपी उपाययोजना काय असतील हे पथकाने स्पष्ट केले नसले तरी ते महिनाभरात थेट अहवालातून समोर येईल. या दौऱ्याच्या झंझावाताबद्दल चर्चा तसेच टीका होत असली तरी पथकातील अधिकाऱ्यांना दुष्काळाचे गांभीर्य जाणवले असून केवळ तात्पुरत्या मदतीचा अहवाल देता भविष्यासाठी येथे काय केले पाहिजे, यावरच अधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केल्याचे समोर आले.

गेल्या तीन-चार वर्षांपासून राज्य तसेच केंद्राकडून शेतकऱ्यांना तोकडी मदत केली जात आहे. त्यातून काहीही साध्य होणार नसले तरी ती मदत दिली जावीच. परंतु त्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना झाल्याच पाहिजेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद, जालना तसेच बीड जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केल्यानंतर मंगळवारी रात्री हे पथक लातुरात मुक्कामी होते. तेथे त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी रेणापूर, अंबाजोगाई, दैठणा, परभणी, सेलू, जालना करत सायंकाळी चार वाजता ते औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. पथकाने जेथे पाहणी केली तेथे प्रचंड विदारकता होती.
पथकालाकाय वाटते?

कर्जमाफी,मोफत बियाणे याबाबत राज्य शासनाने सकारात्मक असायला हवे. या दुष्काळी भागाला नदी, नाल्यांचे पाणी कायमस्वरूपी कसे मिळेल, याचे नियोजन व्हावे. "जलयुक्त'ची कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत. कृत्रिम पावसाचा प्रयोग वेळेतच करावा, ठिबकसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. मे महिन्याच्या प्रारंभी कृषी विभागाने हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देऊन कोणती पिके घ्यावीत, याचा सल्ला गावोगाव जाऊन द्यावा, कृषी विभागाने सुचवलेल्या पिकांचे बियाणे शक्यतो मोफत मिळेल, याची व्यवस्था करावी. याशिवाय काही पर्याय हे पथक आपल्या अहवालात सुचवणार आहे.

शेतकऱ्यांकडून मागण्या
संपूर्णकर्जमाफी, नव्याने तातडीने कर्ज, बियाणे-खतांची मोफत उपलब्धी, वीजपुरवठा किमान १२ तास उपलब्ध असावा, शेतातील अंतर्गत नाल्यांत शासनाकडून गाळ काढणे किंवा पुनर्भरणाची अन्य कामे व्हावीत.

‘जलयुक्त’चे कौतुक
दुष्काळपाहणीबरोबरच या पथकाला राज्य शासनाच्या जलयुक्त अभियानादरम्यान करण्यात आलेली कामेही दाखवण्यात आली. या कामांचे पथकाने कौतुक केले. अशी कामे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवीत, अशी सूचना केली आहे. या अभियानाला अवघ्या काही महिन्यांत यश आले असेल तर त्याचा स्वतंत्र आराखडा केंद्राकडे पाठवून आणखी निधी मिळवता येऊ शकतो, असा सल्लाही त्यांनी दिल्याचे समजते.

‘कृत्रिम’ला विलंब का ?
मराठवाड्यातकृत्रिम पावसाचा प्रयोग कितपत यशस्वी झाला, याचीही माहिती या चमूने घेतली. मात्र, असा पाऊस पाडण्यासाठी राज्य शासनाने विलंब का केला, अशी विचारणाही त्यांनी केली. जर दुष्काळाचे सावट जाणवत असेल तर दुष्काळ निवारणावर पैसा खर्च करण्याऐवजी हा पैसा कृत्रिम पावसासाठी पाण्यात घालणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केल्याचे समजते.