आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय युवक महोत्‍सव : महोत्सवात सामाजिक विषयांचा जागर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महोत्सवाच्यादुसऱ्या दिवशी पोस्टर, रांगोळी, इन्स्टॉलेशन, नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण, जलसंवर्धन, स्वच्छ भारत विषय देण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्पर्धकांची संख्या वाढल्याचे डॉ. दिलीप बडे यांनी सांगितले. कल्पकतेतून साकारलेली सुंदर चित्रे, रंगांनी सजलेली रांगोळी आणि इन्स्टॉलेशन करण्यात मग्न झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांंनी आपल्या कल्पकतेतून स्त्री भ्रूणहत्या आणि स्वच्छ भारत अभियानात आमचाही सहभाग आहे, असा संदेश देत युवक महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला..
प्रबोधनकरणारे सादरीकरण
वाढतीस्त्री भ्रूणहत्या, मुलींच्या छेडछाडीची प्रकरणे, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशा विविध विषयांना वाचा फोडत लोकगीत, मूकाभिनय आणि रांगोळीतून सहभागी स्पर्धकांनी सामाजिक विषयांचा जागर केला.
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा
पोस्टरप्रदर्शन स्पर्धेत ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छ भारत, स्त्री भ्रूणहत्या, राष्ट्रीय एकात्मता हे विषय देण्यात आले होते. टू साइजवरील कागदावर अडीच तासांची वेळ देण्यात आली होती. या वेळेत विद्यार्थ्यांनी अतिशय संुदर शब्द आणि रंगसंगतीच्या माध्यमातून पोस्टर रंगवले. ‘पृथ्वीशी जोडलेली आहे माझी नाळ, जन्माआधीच नका करू गहाळ,’ असा संदेश देण्यात आला.
रांगोळीतून स्वच्छ भारत
पंतप्रधानांच्याहातात झाडू असलेले चित्र आणि स्वच्छ झालेले शहर असा रंगसंगतीचा खेळ रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी सादर केला. या स्पर्धेसाठी ‘स्वच्छ भारत : पर्यावरण’ असा विषय देण्यात आला होता. यंदा प्रथमच १२० स्पर्धक यात सहभागी झाले होते.
ग्रामस्वच्छताइन्स्टॉलेशन : इन्स्टॉलेशनया स्पर्धेत विद्यार्थ्यांना थिम बेस्ड विषय देण्यात येतो. त्यात त्यांनी आपल्या कल्पकतेतून सादरीकरण करायचे असते. यंदाच्या या स्पर्धेत पाणीटंचाई आणि पंतप्रधानांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान, ग्रामस्वच्छता हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत ६५ जण सहभागी झाले होते.
श्रद्धा हवी, अंधश्रद्धा नको
विद्यापीठानेयुवक महोत्सवात स्वच्छ भारत अशी थीम दिली. यापुढचे पाऊल उचलत स्वच्छतेबरोबरच साक्षरता आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पाथ्री येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी रोज एक थीम घेत विविध रंगांच्या टोप्या परिधान केल्या आहेत. शनिवारी स्वच्छ भारतनंतर आज रविवारी विद्यार्थ्यांनी लाल रंगांच्या टोप्या घालून त्यावर लिहिलेल्या ‘श्रद्धा हवी, अंधश्रद्धा नको’ या सुविचारातून संदेश दिला.