औरंगाबाद - कलावंत म्हणून सुप्त गुणांना पुढे आणा. त्यासाठी भरपूर मेहनत करा, त्यातूनच यशस्वी होण्यासाठी पुढची वाट सापडेल, असा सल्ला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शनविारी दिला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
महोत्सवाच्या उद््घाटनाप्रसंगी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. संभाजी भोसले, प्रा. गजानन सानप, डॉ. नलिनी चोपडे, डॉ. धनराज माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरूंना नविेदन : विद्यार्थीकल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी कुलगुरूंकडे प्रकाश इंगळे, कुणाल खरात, नीलेश अंबेवाडीकर, आशिष इंगळे, राजरत्न गवई, इब्राहिम तडवी, अमरदीप वानखेडे, अविनाश इंगळे, अस्लम पठाण, अर्चना पंडागळे, मनीषा उजमरे, सिद्धार्थ उपर्वट यांनी केली.
विद्यार्थ्यांचे हाल : जेवणातील अव्यवस्थापनामुळे काही विद्यार्थी जेवले, तर काही जेवणापासून वंचित राहिले. काहींना स्वयंपाकच उरला नाही. दुपारचे सत्र उशिराने सुरू झाले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे ओल्या व्यासपीठावरच सादरीकरण करावे लागले. तसेच विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरीस गेल्याची तक्रार प्राध्यापक आिण विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महाेत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. संभाजी भोसले, प्रा. गजानन सानप, डॉ. नलिनी चोपडे, डॉ. धनराज माने आदी.
संघटनांचा बहिष्कार
मुख्यकार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला. यात राष्ट्रवादीचे विजय वाहूळ, विलास मगरे, सतीश शिंदे, सुनील म्हेत्रे, कपिल बनकर, संदीप जाधव, नितीन गायकवाड, अामिर शेख, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांचा समावेश होता.
विद्यापीठ विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचविांना अद्याप कार्यालय देण्यात आलेले नाही. याचा निषेध नोंदवून विद्यार्थी प्रतिनिधींनी आंदोलन केले. उद््घाटन सोहळ्यात परिषदेचे अध्यक्ष लखनलाल भुरेवाल, सचवि माधुरी मिरकर, सचवि नामदेव कचरे यांनी बाहेर बसून कार्यक्रम बघितला.
ललित कला विभागात पार पडलेल्या मृद मूर्तिकला स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. वात्सल्य, युवा शक्ती, निसर्ग, मानव या विषयांवर आधारित स्पर्धेत स्पर्धकांनी तयार केलेली शिल्पे लक्षवेधी ठरली. मुलगा, आई, दूध पिताना वासरू, पृथ्वी मानव अशा सुंदर शिल्पांनी स्पर्धेत रंगत भरली.