आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Youth Festival: Students And Artist Enjoy In Bamu Campous

केंद्रीय युवक महोत्सव : नटरंग फेम सोनाली कुलकर्णीच्‍या हस्‍ते उद्घाटन, कलावंतांचा जल्‍लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कलावंत म्हणून सुप्त गुणांना पुढे आणा. त्यासाठी भरपूर मेहनत करा, त्यातूनच यशस्वी होण्यासाठी पुढची वाट सापडेल, असा सल्ला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शनिवारी दिला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. संभाजी भोसले, प्रा. गजानन सानप, डॉ. नलिनी चोपडे, डॉ. धनराज माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कलावंतांसह रसिकांची धम्‍माल
काल (दि.13 डिसेंबर) रोजी युवक महोत्‍सवाला सुरुवात झाली. भारुड, मिमिक्री, सुगम गायन, पाश्‍चात्‍य गायन, प्रश्‍नमंजुषा, मृदूमुर्तीकला आदी कलांचे सादरीकरण झाले. कलारसिकांनीही कलावंताना भरभरुन प्रतिसाद दिला. सर्वांनी धम्‍माल केली.
(सर्व छायाचित्रे- सागर चौधरी)
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे..