आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Likely To Restrict Quota Of Private Haj Tour Operators This Yr

हज यात्रेकरूंच्या कोट्यात 20 टक्के कपात : डॉ. हुसेन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मक्का-मदिना येथे बांधकाम सुरू असल्याने सौदी अरेबिया सरकारने प्रत्येक देशाच्या यात्रेकरूंच्या कोट्यात वीस टक्के कपात केली आहे. हज हाऊस कमिटी आणि विदेश मंत्रालयाला त्यासंबंधी कळवण्यात आल्याचे केंद्रीय हज हाऊस कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शाकेर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरवर्षी देशभरातून एक लाख 70 हजार भाविक हज यात्रेसाठी जातात. त्यात मराठवाड्यातील तीन हजार 100 यात्रेकरूंचा समावेश असतो.

ते म्हणाले, प्रत्येक देशातील यात्रेकरूंचा विशिष्ट कोटा ठरवून देण्यात आला आहे. त्याप्रमाणे एक लाख 45 हजार यात्रेकरू हज कमिटीमार्फत तर उर्वरित 25 हजार यात्रेकरू खासगी टूर्स ऑपरेटरमार्फत हज यात्रेला जातात. मात्र यंदा या कोट्यात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. त्याचा फटका देशातील 34 हजार यात्रेकरूंना बसणार आहे. दरम्यान, हज कमिटीच्या कोट्यातील सर्व भाविकांनी 50 टक्के निधी जमा केला असून त्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. त्यामुळे कोटा कमी करू नये, अशी विनंती हज कमिटीतर्फे सौदी अरेबिया सरकार, विदेश मंत्रालय, महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आल्याचे डॉ. हुसेन म्हणाले.

पत्रकार परिषदेवेळी करीम पटेल, मोहंमद बेग, मोहंमद वसीम, अजीज कुरेशी, शिवचरण फोकमारे, शेख अब्दुल खालेद यांची उपस्थिती होती.