आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी 51 केंद्रांवर ‘सीईटी’, मराठवाड्यातील 19 हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग संलग्नित महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १९ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. चार जिल्ह्यांतील ५१ केंद्रांवर सोमवारी (दि. १०) प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. दिलीप खैरनार यांनी दिली. 

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस संलग्नित १२७ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात ‘सीईटी’च्या माध्यमातूनच होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात झाली असून १० जुलै रोजी ‘सीईटी’ घेण्यात येणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील ५५ विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयांसाठी तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना उस्मानाबाद जिल्ह्यात १२७ पदव्युत्तर महाविद्यालयात ‘सीईटी’ घेण्यात येईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयांसाठी ही ‘सीईटी’ देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - ऑनलाइनअर्ज दाखल करणे (१२ जून ते जुलै), प्रवेशपूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट), द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) याप्रमाणे वेळापत्रक आहे. 

५१ केंद्रांवर परीक्षा 
पदव्युत्तरअभ्यासक्रमासाठी १९ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून चार जिल्ह्यांतील ५१ केंद्रांवर सोमवारी (दि. १०) प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे. परीक्षा केंद्र विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे : औरंगाबाद - २७ केंद्रे, १० हजार ५७३ विद्यार्थी, जालना- केंद्रे, हजार ६७४, बीड - केंद्रे, हजार ३७४, उस्मानाबाद- केंद्रे, हजार ४०० विद्यार्थी आहेत. या जिल्ह्यांत डॉ. दिलीप खैरनार, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. मजहर फारुकी डॉ. संजय साळुंके हे समन्वयक आहेत. प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, उपकुलसचिव संजय कवडे पदव्युत्तर विभाग, युनिकमधील सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत. सीईटीचा निकाल १५ जुलै रोजी लागणार आहे. 

आज कार्यालय सुरू 
पदव्युत्तरसीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट शुक्रवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासंबंधीची अधिक माहिती विद्यापीठाच्या bamu.ac.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच रविवारी पदव्युत्तर विभाग युनिक विभाग सुरू राहणार आहेत. यासंदर्भात अडचण आल्यास प्रोग्रामर यशपाल साळवे प्रमोद गुलगुले यांच्याशी स्मारक साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...