आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CET Result Server Down Student Harassment At Aurangabad

सीईटीच्या विद्यार्थ्यांना डाऊन सर्व्हरचा फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मात्र, ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्याने संकेतस्थळावर निकाल पाहता न आल्याने विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने 16 मे रोजी ही प्रवेशपूर्व परीक्षा घ्ोण्यात आली होती. बुधवारी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे इंटरनेट कॅफे, मोबाइलवर विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू होती.

काही विद्यार्थ्यांनी तर नवीन सिमकार्ड, मोबाइलमध्ये थ्रीजी नेट रिचार्जही केले. मात्र, ऐनवेळी संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पाच तास ताटकळत बसावे लागले. यंदाची सीईटी अखेरची होती. पुढील वर्षापासून एकच सामायिक परीक्षा असणार आहे. दुपारी 4 वाजेनंतर संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला. राज्यभरातून दोन लाख 95 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातून इंजिनिअरिंगच्या राज्यातील एक लाख 10 हजार व फार्मसीच्या 28 हजार जागा भरल्या जाणार आहेत.