आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड: बसखाली सापडून सात वर्षांची चिमुरडी ठार,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- बसखाली चिरडून सात वर्षांची बालिका ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. शहरालगत असलेल्या डोंगरगाव फाट्यावर मंगळवार, दि.७ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अपघात घडला. सपना संजय फुले (७, रा. मंगरूळ, ता. सिल्लोड) ही वडील संजय फुले आईसह आजोळ डोंगरगाव येथून दुचाकीवरून आपल्या गावी मंगरूळ येथे जात होते.
 
दरम्यान, फुले कुटुंबीय सिल्लोड- अजिंठा रस्त्यावरील डोंगरगाव फाट्यावर खरेदीसाठी थांबले होते. सिल्लोड- अजिंठा रस्ता ओलांडताना भरधाव आलेली औरंगाबाद भुसावळ बस (एमएच २० बीएल ३४५५३)ची धडक बसल्याने सपना बसच्या चाकाखाली आल्याने ती जागीच ठार झाली. सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...