आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - सर्मथनगर परिसरातील बंगल्याच्या परिसरात घुसून चोरट्याने मोलकरणीच्या गळ्यातील साडेसात ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सर्मथनगर परिसरातील मंगळसूत्र चोरीची 13 दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
आठवडाभरापासून मंगळसूत्र हिसकावण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत पायी जाणार्या पाच महिलांची मंगळसूत्रे हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच सर्मथनगरातून पायी जाणार्या शिक्षिका उज्ज्वला कुलकर्णी यांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. सिडको गुलमोहर कॉलनीतील वृद्ध महिला झाकिया शाकीर यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. सोमवारी दुपारी सर्मथनगरातील शैलेश जैस्वाल यांच्या घराच्या कंपाउंडचे गेट उघडे असताना सावळा रंग असलेल्या चोरट्याने बंगल्याबाहेरील स्नानगृहात प्रवेश केला आणि भांडी घासणार्या रंजना संजय हिवराळे (43, रा. अवधूत हॉस्पिटलसमोरील गल्लीत, संसारनगर, नूतन कॉलनी) यांना खाली ढकलून देत गळ्यातील साडेसात ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. रंजनाने चोराचे तोंड दाबत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पसार होण्यात यशस्वी झाला. त्याच्यापाठोपाठ पळत रंजना यांनी आरडाओरडा केला. त्याला पकडण्यासाठी एक नागरिक धावून गेला; परंतु त्याच्याही हातून हा चोरटा निसटला आणि सर्मथनगरच्या मागच्या भागातील नाल्याच्या भिंतीवरून पसार झाला. रंजना यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार दिली. तपास उपनिरीक्षक ए. व्ही. सातोदकर करत आहेत.
चोरटे पुन्हा सक्रिय
काही दिवस खंड पडल्यानंतर मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. एका आठवड्यातच पाच महिलांचे मंगळसूत्र हिसकावले असून सर्मथनगर, ज्योतीनगर, सिडको भागात पोलिस गस्त घालत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.