आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chain Sneaker Issue At Aurangabad, News In Marathi

सिडकोतून तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पादचारी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना सिडकोतील एन-8 येथील गणेश हाउसिंग सोसायटी परिसरात सायंकाळी घडली. ज्योती प्रकाश क्षीरसागर या न्यायालयीन सोसायटीपासून पायी निघाल्या होत्या. समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. घटनेने ज्योती घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण करत आहेत.