आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन स्नॅचर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेचे नांदेड विभागाचे व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांच्या दौर्‍यादरम्यान परतूर येथे महिलेचे गंठण हिसकावून पळणार्‍या चेन स्नॅचरला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय शिवाजी चव्हाण (28, रा. पारधी वस्ती, ता. परतूर) असे या चोरट्याचे नाव असून त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र हिसकावून पळणार्‍या आरोपी चव्हाण यास पाठलाग करून रंगेहाथ पकडले. आरोपीविरुद्ध भादंवि 394 नुसार गुन्हा दाखल झाला. यातील तिघे आरोपी फरार आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक एम. एम. बांगी, सहायक पोलिस निरीक्षक अमित उपाध्याय व पोलिस कॉन्स्टेबल नंदूसिंग बैनाडे यांनी पर्शिम घेतले.