आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chain Thief News In Marathi, Chain Thief Issue At Aurangabad, Divya Marathi

सोनसाखळी हिसकावताना महिलेच्या गळ्याला दुखापत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको एन-5 मधील जैन मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परतणार्‍या महिलेची दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी 14 ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली. जोरात हिसका मारल्यामुळे महिलेच्या गळ्याला दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजता सिडकोतील बजरंग चौकात घडली. सलग चौथ्या दिवशीही चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे.
नीता अजितकुमार कासलीवाल (44, रा. सिडको एन-6, राज गॅलक्सी) सिडकोतील चैतन्य जैन मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन बजरंग चौकातून जात असताना सिल्व्हर रंगाच्या युनिकॉन दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. साखळी ओढताच नीता जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार पाहून क्षणार्धात नागरिक घटनास्थळी जमा झाले. चोरटे मात्र आझाद चौकाकडे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नीता यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजाराम तडवी तपास करत आहेत. सिडको पोलिस ठाण्यातील ही दुसरी घटना आहे. या तीन महिन्यांत शहरात 18 मंगळसूत्रे हिसकावण्यात आली आहेत. गेल्या वर्षी मंगळसूत्र हिसकावण्याच्या 60 घटना घडल्या होत्या.