आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराला बेटाचे तीर्थाटन म्हणून विकास करणार :हरिभाऊ बागडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटाला तीर्थ तसेच पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले. गंगागिरी महाराज द्विजन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री आमदार छगन भुजबळ व आमदार बाळासाहेब थोरात, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा परिषद सभापती संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आमदार छगन भुजबळ यांनी सत्ता कोणाचीही असली तरी त्याचा लोककल्याणासाठी उपयोग व्हावा, असे सांगून सराला बेटाच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची आठवण देऊन पुढील काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सराला बेट हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनत असून त्याच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून काम करण्याचे आवाहन केले. रामगिरी महाराजांच्या कीर्तनानंतर महाप्रसादाच्या वाटपाने द्विशताब्दी जन्मोत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमास अनेक साधुसंत व आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्रेहलता कोल्हे, डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, अविनाश गलांडे यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते.
दरम्यान, भक्तिमार्गात जात, धर्म, कूळ या बाबींना महत्त्व नसून केवळ भगवंताच्या प्राप्तीचे चिंतन करणे यालाच भक्तिमार्ग असे म्हणतात. त्यामुळे भक्तिमार्गात दृढता, एकाग्रता व एकनिष्ठता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी येथे शेकडो भाविक व मान्यवरांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनप्रसंगी केले.