आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘चला हवा येऊ द्या’ने उडवले हास्याचे फवारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उत्तम अभिनयातून रसिकांना पोट धरून हसायला लावणारे विनोद आणि एकापेक्षा एक अवीट श्रवणीय गीतांनी रसिक मनावर भुरळ घालणाऱ्या “चला हवा येऊ द्या’च्या टीमने रसिकांना मनसोक्त हसवले. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या लावणीतील अदाकारीने रसिकांच्या शिट्यांचा आवाज टाळ्यांचा कडकडाट या वेळी ‘युगंधर’मध्ये दुमदुमला. 

युगंधर सेवाभावी प्रतिष्ठान, संस्थापक अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांच्या वतीने जबिंदा मैदानावर आयोजित युगंधर रास दांडियात रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, आमदार संदीपान भुमरे, आमदार सुभाष झाबंड, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सिनेअभिनेते मंगेश देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपमहापौर स्मिता घोगरे, युगंधर रास दांडिया अध्यक्ष नितीन घोगरे, सचिव सिद्धांत शिरसाट, विकास जैन, विजय वाघचौरे, राजेंद्र राठोड, शशिकांत ढमढेरे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. जितेंद्र तुपे यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायिका धनश्री देशपांडे यांचे बहारदार गायन रंगले. अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने “मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका’ ही लावणी सादर केली. कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांच्या खवचट विनोदाने रसिकांना पोट धरून हसायला लावले, तर अभिनेते भारत गणेशपुरे सागर कारंडे यांची विनोदी जुगलबंदी रंगली. 
बातम्या आणखी आहेत...