आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७ केंद्रांवर मिळणार चणाडाळ,आदेश मिळताचा वितरण सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीच्या तोंडावरच बाजारपेठेत हरभरा डाळीचे (चणाडाळ) दर दुपटीने वाढल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील रेशन दुकानांसह शहरातील १७ अाऊटलेट्सवर डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासनाच्या आदेशानंतर डाळ विक्री सुरू केली जाईल.
बाजारात सध्या हरभरा डाळीचे दर १३० ते १४० रुपये प्रतिकिलो आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्यामुळे राज्यात सर्वत्रच डाळीचे भाव कडाडले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्वस्तात डाळ देणार आहे. जिल्ह्यात साधारण अडीच हजार क्विंटल डाळ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शहरात आणि रेशनदुकानावर एकाच दरात चणाडाळ उपलब्ध होणार आहे. बीपीएल अंत्योदय कार्डधारकांची संख्या लाख ४७ हजार १८४ इतकी असून रेशन दुकानावर एका कार्डधारकाला एक किलो डाळ मिळणार आहे.

येथे मिळणार स्वस्त डाळ : जुनामोंढ्यातील संजय कुमार अंॅड कंपनी, जिंतेद्र कुमार हिरजीभाई मुंबईवाला, नितीन एंटरप्रायजेस, एस.एस.डी ट्रेडिंग कंपनी, आर.मुथा राइस, पारस ट्रेडर्स जुना मोंढा, तीर्थंकर ट्रेडिंग कंपनी, महावीर राइस ट्रेडिंग कंपनी, अमृत ट्रेडर्स, प्रिया ट्रेडिंग कंपनी, गारखेड्यातील रिलायन्स मॉल, दर्गारोडवीरल मोर मार्केट, सपना सुपर मार्केट, नवा मोंढा येथील संतोष ट्रेडिंग कंपनी, पाटणी ट्रेडिंग कंपनी, फुलचंद स्वरूप जैन, एस.के. ट्रेडिंग कंपनी.

आदेशानंतर वितरण
^जिल्हाप्रशासनाने डाळ वितरणाची तयारी पूर्ण केली आहे. शासनाच्या आदेशानंतर डाळ उपलब्ध करून दिली जाईल. दर किती असेल याचेही आदेश येणे आहेत. भारतकदम, जिल्हा पुरवठा अधिकारी
बातम्या आणखी आहेत...