आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्याय होऊ देणार नाही, गजानन नगरातील नागरिकांना खासदार खैरेंचा दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नव्याविकास आराखड्यात नागरिकांच्या घरावरच आरक्षण टाकल्यामुळे ते भयभीत झाले आहेत. ज्या घरांवर आरक्षण टाकले, त्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी गजाजननगर-पुंडलिकनगरातील रहिवाशांना भेट देऊन अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.

नागरिकांनी खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याची विनंती निवेदनात करण्यात आली. ज्यांच्या घरावर आरक्षण टाकण्यात आले आहे, त्यांना हरकती, दावे दाखल करता यावे, याकरिता गटनेते राजू वैद्य यांनी सहायता केंद्र स्थापन केले आहे. नागरिकांनी या सहायता केंद्राची मदत घेण्याचे आवाहन या वेळी करतानाच खासदार खैरे यांनी या उपक्रमाची स्तुती केली. या वेळी राजू वैद्य, नगरसेवक नंदकुमार घोडेले, मीना गायके, आत्माराम पवार, गजानन मनगटे, माजी नगरसेवक दिग्विजय शेरखाने, सूर्यकांत जायभाय, संतोष खेंडके, दीपक पवार, गोपाल राजपूत, बापू कवळे, शिवा महाले, सोमदे पाटील, खंडू औटे, दिलीप हागरे, शिरसाट, मनपाचे डी.पी.कुलकर्णी, वसंत निकम, ए. डी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी किशोर तिवारी, चंद्रहंस काटोले, उदय दपे, फौलाने पाटील, अमोल घोडके, योगेश पुणे, वैजीनाथ नागुलकर, सुनील सोनवणे, बळीराम शेळके, गोपालसिंग राजपूत, मुकुंद सोमदे, मुरलीधर वाखोरे, परमानंद मचिवाल, शैलेंद्र जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.