आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलमंडीशिवाय दुसऱ्या वॉर्डातील बंडखोरी दिसत नाही का? तनवाणींच्या सवालामुळे खैरे संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "एवढ्यावॉर्डांत बंडखोर उभे आहेत. तुम्हाला गुलमंडीशिवाय दुसरा वॉर्ड दिसत नाही का?' असा सवाल माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना केला. त्यावरून या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी (१३ एप्रिल) हा प्रकार झाला.

सध्या युतीमध्ये जोरदार बंडखोरी झाली आहे. भाजपच्या विरोधात शिवसेनेचे किमान ३०, तर शिवसेनेच्या विरोधात भाजपचे ७५ बंडखोर आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी युतीच्या नेत्यांची तातडीची बैठक दानवे यांनी आज स्वत:च्या निवासस्थानी आयोजित केली होती. त्यात वॉर्डनिहाय कोण बंडखोर आहेत आणि त्यांना कसा आवर घालता येईल, यावर चर्चा झाली. यात दोन-तीन वेळा खैरे यांनी गुलमंडीचा मुद्दा उपस्थित केला. येथे तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना उमेदवार आणि खैरे यांचे पुतणे सचिन अडचणीत असल्याचे सांगण्यात येते. खैरे यांनी राजूची उमेदवारी कोण मागे घेणार, अशी वारंवार विचारणा सुरू केली. किशनचंद यांनी पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्वीकारावी, असेही ते म्हणाले. त्यामुळे तनवाणी भडकले. संपूर्ण शहरात बंडखोरीची लागण झाली आहे. भाजप उमेदवारांच्या विरोधात खैरे समर्थक उभे ठाकले आहेत. त्यांना शिवसेनेकडून आवर घातला जात नाही. आम्ही समजूत घालण्यासाठी गेलो असता ते दाद देत नाहीत. त्याकडे लक्ष द्यायचे सोडून गुलमंडी एके गुलमंडीचा धोशा कसा लावता, असा सवाल त्यांनी केला. त्यावरून खैरेही संतापले. तनवाणी भाजपला बुडवतील, असा हल्ला करताना तनवाणी विषयाला वेगळे वळण देत आहेत. गुलमंडीचा वॉर्ड शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात भाजपच्या बंडखोराने माघार घेतली पाहिजे, असे मी म्हणत असेल तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी केला. हा वाद वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्हे दिसल्यावर दानवे यांनी त्यात हस्तक्षेप करून चर्चा अन्य वॉर्डांकडे वळवली. या वेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
बंडोबांचीहोणार हकालपट्टी : जेबंडखोर माघार घेता आता प्रचार सुरूच ठेवतील त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे, असे दानवे म्हणाले. बंडखोरांच्या विरोधात दोन्ही पक्षांची संयुक्त रॅली काढली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.


फारसे गंभीर नाही
खैरे वारंवार गुलमंडीचाच मुद्दा उपस्थित करत होते. त्यावर मी अन्य वॉर्डांचे काय, भाजपच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उभे आहेत, त्याविषयी का बोलत नाही, एवढेच विचारले. त्यात फारसे गंभीर नाही.
किशनचंद तनवाणी, माजीआमदार
तनवाणींची तक्रार
तनवाणींच्या बंधूंनी केलेल्या बंडखोरीबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशीही मागणी मी केली आहे.
-चंद्रकांत खैरे, खासदार