आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire Dares Rajendra Darda To Fight Election Against Him

दर्डांनी माझ्याविरोधात उभे राहून दाखवावेः खासदार खैरे यांचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हिंमत असेल तर राजेंद्र दर्डा यांनी माझ्या विरोधात उभे राहून दाखवावे, असे आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले. दर्डा यांच्याच सांगण्यावरूनच नगरसेवकांनी माझ्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, असा आरोपही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

दर्डा यांनी नगरसेवकांचा वापर करून खड्डय़ांचे राजकारण केले पण ते त्यांच्याच अंगलट आले. ते मंत्री असूनही त्यांनी शहरासाठी एक छदामही आणला नाही. याउलट आपण आतापर्यंत कोट्यवधी रुपये मिळवून दिले, असा दावाही त्यांनी केला.

दर्डा झोपा काढतात, मी नव्हे : मी जनतेतील कार्यकर्ता आहे. जनतेच्या कामासाठी मी सदैव हजर असतो. मोबाइल बंद करून दर्र्डांप्रमाणे मी झोपा काढत नाही.

डी गँग : महानगरपालिकेत 12-13 नगरसेवक डी गँग नावाने ओळखले जातात. एका वरिष्ठ अधिकार्‍याबरोबर ते दर आठवड्याला जेवणासाठी जातात. तेथे माझ्या आणि पालिकेच्या बदनामीचा कट रचला जातो.

विकासाचा दावा

0समांतर जलवाहिनी आणली.

0सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तीनशे कोटी केंद्राकडून आणतोय.

0वीज बिलात पालिकेचे दरमहा 35 लाख रुपये वाचवले.

0अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या विकासासाठी 50 कोटी आणले.

0आमदार असताना 23 कोटी, तर मंत्री असताना 50 कोटींची कामे केली.


दर्डा यांच्यावर थेट आरोप

दर्डांनी पालिकेसाठी एक छदामही आणला नाही. शेंद्रय़ातील साडेआठ एकर जागेवर कोणताही उद्योग सुरू केला नाही. माझी संपत्ती नाही की काही व्यवसाय. पण दर्डा व्यवसाय तर करतात, पण तेही फसवणुकीचे. कोळसा घोटाळ्यातही त्यांचे नाव आहे.

ते नगरसेवक टिनपाट

माझ्यावर आरोप करणारे नगरसेवक टिनपाट आहेत. एकाचे गणेश तांबे आत्महत्या प्रकरणात नाव असून ते प्रकरण पुन्हा उकरून काढेन, असा दावाही खैरेंनी केला. कला ओझा महापौर होताच बदनामीची मालिका सुरू झाली, असेही ते म्हणाले.