आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांची फॉर्च्यूनर दिसते, तुमच्या युवराजाची मर्सिडीझ नाही? शिवसेना खासदाराविरोधात व्हॉट्सअॅप मेसेज मोहिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात औरंगाबादमध्ये व्हॉट्सअॅप मोहिम सुरु झाली आहे. - Divya Marathi
खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात औरंगाबादमध्ये व्हॉट्सअॅप मोहिम सुरु झाली आहे.
 औरंगाबाद -खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिवसेनेत व्हॉट्सअॅप मेसेजची मोहीमच सुरू झाली असून अशाच एका मेसेजवरून महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटकांना त्यांच्या सहकाऱ्यांना एवढे सुनावण्यात आले की त्यानंतर चक्कर येऊन पडल्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवसंपर्क मोहिमेच्या आढावा बैठकीतच हा प्रकार झाल्याने शिवसेनेत या प्रकारावर चविष्ट चर्चा रंगल्या आहेत. 
 
शिवसेनेच्या वर्धापनदिनी राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत खासदार चंद्रकांत खैरे यांची चकमक झाल्यानंतर एक मेसेज शिवसेनेच्या वर्तुळात फिरत आहे. त्यात खासदार चंद्रकांत खैरे यांना निशाणा करून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. काही आक्षेपार्ह संदर्भ असलेला हा मेसेज शिवसेना महिला आघाडीच्या ग्रुपवर पोस्ट करण्यात आला. त्याची गंभीर दखल घेण्यात आली. शिवसेना महिला आघाडीतील गटबाजी जास्तच तापली त्याचे पर्यवसान महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी उपजिल्हा संघटक सुनीता देव यांच्या संघर्षात झाले. 
 
काल सुभेदारीवर शिवसंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात हा विषय निघाला वातावरण चांगलेच तापले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आधी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देव त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रकाराबाबत चांगलेच सुनावले. त्यानंतर विनोद घोसाळकर यांनीही महिला आघाडीच्या या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. याच दरम्यान रंजना कुलकर्णी त्यांच्या सहकारी तसेच सुनीता देव त्यांच्या सहकारी यांच्यात वादावादीही झाली. यानंतर सुभेदारीबाहेर पडलेल्या देव यांना ताण असह्य झाल्याने चक्कर आली त्या खाली पडल्या. त्यांना तेथून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. 
 
मूळ कन्नडमध्ये? : या प्रकाराची शिवसेनेत चविष्ट चर्चा सुरू असून असे मेसेज टाकण्यापर्यंत वेळ का आली असाही सवाल केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेसेज हल्ल्याचे मूळ कन्नडमध्ये आहे. 
 
खासदार खैरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपले पुत्र ऋषिकेश खैरे यांना उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. मागील वर्षापासून तशा हालचाली सुरू केल्या आहेत. यावरून तेथील विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव खासदार खैरे यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आता तर आमदार जाधव यांनी खासदार निधीतील कामांचा जाहीर पंचनामाच सुरू केला आहे. त्यामुळे जून रोजी औरंगाबादेत वादावादीचा प्रकार घडल्यानंतर खैरेंविरोधी मेसेजेस शिवसैनिकांना व्हॉट्सअॅपवर येत आहेत. 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे मेसेजमध्ये... 
 
हे ही वाचा...