आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खैरे-शांतीगिरी यांचे मनोमिलन?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - ‘सबसे बडा बाबा, खैरे बाबा’ हे ब्रीदवाक्य घेऊन शांतीगिरी महाराजांच्या विरोधात गेल्या वेळी लोकसभा निवडणूक जिंकलेले खासदार चंद्रकांत खैरे 5 वर्षांनी शनिवारी शांतीगिरींच्या चरणी लीन झाले. या वेळी बाबांनी खैरेंना आशीर्वाद दिल्याने दोघांत दिलजमाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या निवडणुकीत आपण उभे राहणार नसलो तरी राजकारणात आपला सक्रिय सहभाग राहील, असे महाराजांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाबाजींचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची मठात रीघ लागली होती. कॉँग्रेस, मनसे, विहिंप आदी पक्षांचे नेते बाबाजींचे आशीर्वाद घेऊन गेले; परंतु शिवसेनेचा एकही पदाधिकारी फिरकला नव्हता. अखेर शनिवारी दुपारी खैरे कार्यकर्त्यांसह मठात दाखल झाले व त्यांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले.