आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire News In Marathi, MP, Aurangabad Lok Sabha Constituncy

सिंथेटिक ट्रॅक, हॉकीप्रेमींसाठी अँस्ट्रॉटर्फची सुविधा हवी,खा. खैरेंकडून क्रीडा क्षेत्राच्या अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक शिवाय हॉकीप्रेमींसाठी अँस्ट्रॉटर्फची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. या सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्हय़ाचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवू शकतील. खा. खैरे यांनी या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आशा क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातील क्रीडा संघटना, खेळाडू, पालकांचा मेळावा सोमवारी ईडन गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खेळाडू, पालक, क्रीडा संघटनांनी अपेक्षा व्यक्त केली.


तर शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय केंद्रात (साई) सिंथेटिक ट्रॅक आणि हॉकीपटूंसाठी अँस्ट्रोटर्फ आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. औरंगाबाद क्रीडा क्षेत्रातील पितामह म्हणून ओळख असणारे सुधीरदादा जोशी, दिलीप पेरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शिरीष बोराळकर, बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे डॉ. संजय मोरे, डॉ. मकरंद जोशी, डॉ. फुलचंद सलामपुरे, हिरा सलामपुरे, अँड. संजय डोंगरे, कमांडर विनोद नरवडे, नगरसेवक पंकज भारसाखळे, सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, तालीम संघाचे विनायक पांडे, गोविंद भुसारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे राजेश पाटील, बुद्धिबळ संघटनेचे हेमेंद्र पटेल, मनोज मुळे, तलवारबाजी संघटनेचे डॉ. उदय डोंगरे, पॉवरलिफ्टिंग संघटनेचे जसप्रीतसिंग भाटिया, हंसराज डोंगरे, खो-खो संघटनेचे गोविंद शर्मा, तायक्वांदो संघटनेच्या लता कलवार, संदीप जगताप, प्रसाद कुलकर्णी, दिनेश वंजारे, राकेश खैरनार, सतीश पाटील, डॉ. गोविंद कदम, पॅराग्लायडिंगचे जयंतीभाई पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद तांदुळवाडीकर, विनोद माने आणि रणजित पवार यांनी परिश्रम घेतले.