आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire News In Marathi, Narendra Modi, BJP, Shiv Sena

मोदींच्या लाटेमुळे देशात सत्तापरिवर्तन अटळ - चंद्रकांत खैरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - देशात व राज्यात आघाडी सरकारच्या कारभारामुळे जनता त्रस्त असून खंबीर व सक्षम नेतृत्व केवळ नरेंद्र मोदीच देऊ शकतात. त्यामुळेच मोदींची लाट निर्माण झाली असून देशात सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन खासदार खैरे यांनी केले.


औरंगाबाद लोकसभेचे शिवसेना उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्नड तालुक्यातील हतनूर येथून करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार हर्षवर्धन जाधव, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, सुहास दाशरथे, लता दलाल, युवा सेनेचे ऋषी खैरे, किशोर नागरे, राजेंद्र राठोड, शिवाजी थेटे, राम पवार, अनिता शिंदे, धीरज पवार, संजय ठोकळ, संतोष कोल्हे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. युतीची सत्ता असताना चोवीस तास वीज, कापसाला चांगला भाव, उसाला चांगला भाव मिळवून दिला होता. संपूर्ण देशात हिंदुत्वासह मोदींची लाट असून सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याने आघाडी सरकार नरेंद्र मोदींच्या विरोधात गुजरात दंगलीबाबत अपप्रचार करत असल्याचे खैरे यांनी सांगितले. या वेळी दिलीप मुठ्ठे, संजय ठोकळ, हर्षल मुळे, हतनूरचे माजी सरपंच लक्ष्मण केरे, किशोर पवार, फुलचंद कुंटे, प्रकाश शिंदे आदींची उपस्थिती होती. खैरे यांच्या हतनूर, चिकलठाण, औराळा, देवगाव या ठिकाणी प्रचारसभा झाल्या.