आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire News In Marathi, Shiv Sena, Subhash Lomte, Divya Marathi

निवडणूक खर्चात चंद्रकांत खैरे नंतर आम आदमी दुसर्‍या क्रमांकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी खर्च करताना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यानंतर दुसरा क्रमांक लावला आहे. आतापर्यंत खैरेंनी 4 लाख 45 हजार रुपयांचा खर्च आयोगाच्या दप्तरी दाखवला असतानाच त्यांच्यापाठोपाठ लोमटे यांचा क्रमांक असून त्यांनी 4 लाख 34 हजार रुपये खर्च केले आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत 2 लाख रुपये खर्च करणार्‍या काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांचा खर्च फक्त 2 लाख 46 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे वेल्फेअर पार्टीचे फिरोज खान आणि अपक्ष कैलास ठेंगडे यांनी अमानत रक्कम वगळता एकही रुपया खर्च केला नसल्याचे आयोगाला कळवले आहे.

समाजवादी पक्षाचे उमेदवार सदाशिव गायके यांनी 49 हजार रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. हे सर्व आकडे 12 एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचे आहेत. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चामध्ये खुच्र्या, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे याचाच बहुतांशी खर्च आहे, कोणीही जेवणावळी तसेच पाहुणचाराचा खर्च सादर केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच प्रकारातील खर्च जास्त आहे. मात्र, कोणीही कोणा विरोधात तक्रार न केल्याने याची चौकशी निष्पक्ष म्हणवणार्‍या आयोगाला करता आलेली नाही.