आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP च्या आव्हानाबद्दल विचारताच खैरे भडकले, म्हणाले- अजिबात बोलणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या निधीचा वापर कोठे केला, याचा हिशेब द्या, या भारतीय जनता पक्षाच्या मागणीवर खैरे यांनी शुक्रवारी मौन धरले. ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच केलेल्या टीकेमुळे इतरांना मोठी प्रसिद्धी मिळाल्याने खैरे संतप्त झाले होते. ‘मी काहीही बोलणार नाही, तुम्हाला काय छापायचे ते छापा’ असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता.

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्याबरोबरच खैरे यांनी उपमहापौर प्रमोद राठोड यांना लक्ष्य केले होते. दानवे यांनी खैरेंच्या टीकेकडे दुर्लक्ष केले. जंजाळ यांनी थेट खैरे यांचे घर गाठत ‘माझे तंगडे तोडा’ म्हणत खळबळ उडवून दिली, तर राठोड यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेत खैरे यांच्या खासदार निधीचा वापर कोठे झाला, असा सवाल उपस्थित केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी...