आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांदवड तहसील कार्यालयावर वारकरी मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड: चांदवड तहसील कार्यालयावर वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध मागण्यांसाठी टाळमृदंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार वाय. डी. मैलागीर यांना निवेदन देण्यात आले.
स्वानंद वारकरी बहुउद्देशीय प्रबोधन मंडळाच्या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष महाराज ठाकरे, महाराष्ट्र प्रमुख अवचितानंद महाराज, विजयानंद महाराज बनकर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज बिडगर, तालुकाध्यक्ष सुकदेव महाराज मोरे यांनी केले. मोर्चात राजाराम जामदार, उपाध्यक्ष मधुकर जोपूळकर, भागवत मोरे, दिलीप गवळी, अशोक डोंगरे, शिवाजी महाराज साळसाणेकर, शांताराम आवारे, नारायणबाबा काळखोडेकर, बबनराव कडनोर, निवृत्ती महाराज कानडगावकर आदी सहभागी झाले होते.
सटाण्यात मोर्चा
सटाणा: महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळाच्या विद्यमाने वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी टाळ-मृदंग व भजने म्हणत तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार बी. व्ही.शेलार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रमाकांत जोशी, कृष्णा भामरे, सदाशिव महाराज, रामचंद्र महाराज आदी उपस्थित होते.