आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बदलता चीन’ विषयावर आज कांगोंचे व्याख्यान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीतर्फे ‘बदलता चीन’ या विषयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांचे मंगळवारी (10 सप्टेंबर) व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. कांगो नुकतेच चीन दौर्‍यावरून परत आले आहेत. या दौर्‍यातील त्यांची निरीक्षणे ते मांडणार आहेत. सायंकाळी सहा वाजता महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात होणार्‍या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार राहणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन न्या. बी. एच. र्मलापल्ले, प्रा. दिनकर बोरीकर, ना. वि. देशपांडे, के. एन. थिगळे, अँड. शरद गव्हाणे, तुकाराम पांचाळ यांनी केले आहे.