आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानात बदल; आठ दिवस जाणवेल थंड-गरम वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दक्षिण पश्चिम समुद्रात अतितीव्र हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असून त्याचे ओक्ची नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 


औरंगाबादसह राज्यात अनेक शहरांवर सकाळी, दिवसभर मध्यम ते विरळ ढगांचे आच्छादान पसरले होते. परिणामी किमान तापमानात तीन अंशांनी वाढ होऊन ते शुक्रवारी १२ अंशांवरून १५ अंशांवर पोहोचले होते. ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेत वाढ झाली होती. हवामानातील बदलाने रात्री सकाळी थंडी, दुपार ते सायंकाळ गरमी असे बदल नागरिकांना अनुभवावयास मिळाले. पुढील आठ दिवस आकाशात ढगाचे आच्छादन राहणार आहे. म्हणजेच थंडीचा कडाका कमी जाणवेल, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...