आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"गेट'च्या अभ्यासक्रमात बदल, सकाळी ९ ते १२; दुपारी दोन ते पाच सत्रांत होणार परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट २०१६) परीक्षेच्या अभ्यासक्रमात (सिलॅबस) बदल करण्यात आले असून, हे बदल यंदाच्या परीक्षेपासून लागू करण्यात आले आहेत.
यंदा ३० जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ही परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी ते १२ आणि दुसरे सत्र दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अंॅड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अंॅड इलेक्ट्रिकल्स, काॅम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या प्रकारात बदल करण्यात आले आहेत.

कम्प्युटर सायन्स अंॅड इंजिनिअरिंगमध्ये काॅम्प्युटर नेटवर्किंगचा भाग जोडण्यात आला आहे. तर डाटाबेस आणि डिजिटल यात कोणताही बदल करण्यात आला नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा टॉपिक वगळला असून स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थिअरी ऑफ मशीनचा समावेश करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल अंॅड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डसंबंधी स्वतंत्र प्रश्न विचारण्यात येणार आहेत. अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.