आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर प्रणालीत एप्रिलपासून बदल; "सॅप'मुळे कारभार होणार पारदर्शक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळासह जागतिक मंदीचा फटका विक्रीकर वसुलीत यंदा स्पष्टपणे जाणवत असून औरंगाबाद विभागाला तब्बल ५०० कोटींचा फटका बसला आहे. स्टील, ऑटोमोबाइलसह शेती उद्योगांना प्रचंड नुकसान झाल्याचा परिणाम थेट विक्रीकरावर झाला असून औरंगाबाद विभागाच्या तीन हजार ४१ कोटींच्या उद्दिष्टापैकी फेब्रुवारीपर्यंत दोन हजार १२५ कोटींचा करवसूल झाला आहे. गतवर्षी हजार ६२५ कोटींचा कर वसूल करण्यात आला होता.
औरंगाबाद विभागात जालना, बीड हे जिल्हे औरंगाबाद शहराचा समावेश आहे. औरंगाबादनंतर जालना शहरातून सर्वाधिक विक्रीकर मिळतो. जालना येथील ५० टक्के स्टील उद्योग बंद झाल्याने २७० कोटी रुपयांचा विक्रीकर बुडाला तर स्कोडा कंपनीने करभरणा पद्धतीत बदल केल्याने विभागाचा महसूल ३०० कोटींनी घटला. आटोमोबाइल क्षेत्राकडे २२९ कोटींची थकबाकी आहे तर कापूस उद्योग सहा कोटी, प्लास्टिक उद्योगाकडे पाच कोटींचा विक्रीकर थकला आहे.

स्कोडा,लाव्हा, कोरोमंडल बाहेर पडल्याचा फटका
दरवर्षी३०० कोटींचा विक्रीकर जमा करणाऱ्या स्कोडा कंपनीने यंदा करभरणा पद्धतीत अामूलाग्र बदल केला आहे. देशभरातील कार्यालयांची त्या-त्या विभागांत विभागणी केल्यामुळे करभरणा करण्याची रक्कम १२.५० टक्क्यांवरून अवघ्या दोन टक्क्यांवर आली. विशेष म्हणजे हा करही थेट केंद्राकडे जमा होतो. तसेच लाव्हा कोरोमंडल या कंपन्या विभागातून बाहेर पडल्याने त्यांच्याकडून करापोटी मिळणाऱ्या ३० कोटींवरही पाणी सोडावे लागले आहे.

३२ हजार करदाते
औरंगाबाद विभागात एकूण ३२ हजार विक्रीकरदाते आहेत. यापैकी ४०५ करदाते दरवर्षी प्रत्येकी कोटी रुपयांचा विक्रीकर भरतात. एप्रिल महिन्यापासून शासन विक्रीकर धोरणात अामूलाग्र बदल करीत असून सॅप प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे कोणी किती माल खरेदी-विक्री केला याचा तपशील विक्रीकर विभागासह त्या व्यापाऱ्याला कळण्यास मदत होणार आहे.

अडचणी सांगा, मार्ग काढू
वारंवार येणाऱ्या नोटिसा, करभरणा रकमेतील तफावत, दुष्काळामुळे करभरणा करण्यात येणाऱ्या अडचणींची प्रातिनिधिक उदाहरणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी मांडली. मात्र, कर भरणा टाळू नका. अडचणी आमच्या अधिकाऱ्यांना सांगा. कराचे हप्ते पाडून भरणा करण्याची परवानगी देते, पण कर चुकवू नका असे आवाहन अप्पर आयुक्तांनी केले.

२२९ कोटी आटोमोबाइल
०६कोटी कापूस उद्योग
०५ कोटी प्लास्टिक उद्योग
विक्रीकर विभाग करवसुली कशी करावी, अशा विवंचनेत असताना औरंगाबादचे विक्रीकर उपायुक्त डी.एम.मुगळीकर यांच्या प्रयत्नांना यश आले. शहरातील रस्ते विकास कामांतून मिळणाऱ्या टीडीएसची वसुली वाढवण्यात आली. यातून मागील वर्षी मिळालेल्या १७ कोटींच्या तुलनेत यंदा २७ कोटी रुपये प्राप्त झाले. तसेच औरंगाबादेतील कार्लबर्ग, िवप्रो, बडवे इंजिनिअरिंग, सॅबमिलर, कॅनपॅक, गुडइयर, या कंपन्यांनी विक्रीकर भरणा करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. विभागाला बीएसटी करातून कोटी २५ लाख तर सीएसटी करातून १६८ कोटी रुपये असा २३ कोटी रुपये अधिक कर गोळा करण्यात यश आले आहे. यात हॉटेल व्यावसायिकांडून एेषअाराम करापोटी कोटी २५ लाख, तर ६० कोटींचा व्यावसायिक करही वसूल करण्यात आला.