आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भारतातील 22 दशलक्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जग समस्यांनी ग्रासलेले आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यापासून ते शिक्षणाचा अभाव, पर्यावरणाचा ऱ्हास, गरिबी, आरोग्याच्या तक्रारी आणखी बरेच काही…मात्र, आपण ठरवले तर त्यावरही मात करू शकतो. यासाठी थोडी कल्पनाशक्ती आणि थोड्या पाठपुराव्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन २००९ मध्ये अहमदाबादेत सुरुवात झालेल्या ‘डिझाइन फॉर चेंज’ (डीएफसी) या प्रकल्पात चार सोप्या पायऱ्यांतून विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी तयार केले जाते.
 
जगभरातील ४४ देशांत पोहोचलेली ही मोहीम या वर्षापासून औरंगाबादेतही सुरू झाली अाहे. यासाठी सिव्हिक रिस्पॉन्स टीमने (सीआरटी) पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांत यासाठी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण झाले. शहरभरातील शाळांत ती विनामूल्य राबवली जात आहे. 
 
विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने शिक्षण अाणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे अभ्यासक किरणबीर सेठी यांनी २००१ मध्ये अहमदाबादेत रिव्हरसाइड स्कूलची सुरुवात केली. यातून जन्माला आलेल्या कल्पना ‘डिझाइन फॉर चेंज’ या प्रकल्पाद्वारे इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्रारंभ केला. अवघ्या वर्षांत हा प्रकल्प ४४ देशांत पोहोचला.
 भारतात ४३७९ शाळांद्वारे २२ दशलक्ष विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.
 
या माध्यमातून १,०४,००० वृक्षारोपण, ७५० शौचालयांची निर्मिती, १०० वाचनालयांची स्थापना आणि ४० बालविवाह थांबू शकले. देश-विदेशात गाजलेला हा प्रकल्प औरंगाबादेत सुरू करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत सिव्हिक रिस्पॉन्स टीमने पुढाकार घेतला आहे. वी ते वीच्या वर्गातील विद्यार्थी यात सहभागी होतील. या प्रकल्पासाठी कॅनपॅक कंपनीने सहकार्य केले आहे. 
 
स्वयंसेवक तयार 
सीआरटीद्वारे डीएफसीच्या अंमलबजावणीसाठी एप्रिलपासून लगबग सुरू झाली. दिल्लीहून आलेल्या तज्ज्ञांनी २५ स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. प्रकल्प राबवण्यासाठी १५ ते २० शाळांची निवड करण्यात आली. ही संख्या वाढवण्यासाठी अधिकाधिक शाळांशी बोलणी सुरू आहे.
 
सीआरटीने प्रशिक्षित केलेले स्वयंसेवक शिक्षकांना प्रशिक्षण देतील. मग ते हा प्रकल्प आपापल्या शाळांत राबवतील. यानंतर जुलै ते सप्टेंबर राष्ट्रीय स्तरावर आय कॅन स्केल चेंज ही स्पर्धा होईल. यात प्रत्येक शहराचे डीएफसी चॅप्टर आपापले प्रसंग शेअर करतील, असे नताशा यांनी सांगितले. 
 
डीएफसी ही एक चळवळ... घटनांकडे चौकसपणे पाहण्यास शिकवते 
सीआरटीच्या संस्थापक संचालक नताशा झरीन म्हणाल्या, डीएफसी ही एक चळवळ आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे अधिक चौकसपणे पाहण्यास शिकवले जाते. एखादी समस्या सोडवण्यासाठी थोडासा बदलही महत्त्वाची भूमिका बजावतो. हा बदलच समस्येवर समाधान ठरू शकतो. हा बदल करून त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी पायऱ्यांतून प्रशिक्षण दिले जाते.
 
डू : या प्लॅनची अंमलबजावणी वेगवेगळ्या टप्प्यांत करा. 

शेअर : केलेल्या कामाचा अहवाल करा. त्याचे पोस्टर्स, व्हिडिओ बनवून तो इतरांशी शेअर करा. 

इमॅजिन : समस्या सोडवण्यासाठी संभाव्य शक्यतांचे चित्र काढा. मित्र, पालक, शिक्षकांची मदत घ्या. वेगवेगळे प्लॅन तयार करा. 

फील : सभोवताली चौकसपणे बघणे. यातून समस्या दिसतात. त्या ओळखून कागदावर मांडा. लोकांशी बोला. 
 
शाळांनी संपर्क साधावा 
शाळेत शिकवलेले ज्ञान व्यावहारिक उपयोगात आणण्यासाठी डीएफसी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. यातून विद्यार्थ्यांना स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी व्यासपीठ मिळेल. हा प्रकल्प विनामूल्य अधिकाधिक शाळांत राबवायचा अाहे. यासाठी शाळांनी संपर्क साधावा. -नताशा झरीन, समन्वयक, कॅनपॅक-सीआरटी. 
 
बातम्या आणखी आहेत...